---Advertisement---

बिनधास्त खेळ, मी तुझ्या सोबत आहे! विराटचे शब्द ठरले यशसाठी‌ प्रेरणा

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज यश दयालने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत आरसीबी संघाला 2 धावांनी शानदार विजय मिळवून दिला. दोन वर्षा आधी कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग द्वारा पाच षटकार लागल्यानंतर त्याचे पुनरागमन सगळ्यांसाठी प्रेरणा आहे.

आपल्या मुलाला अशा प्रकारचे प्रदर्शन करताना बघून त्याचे वडील चंद्रपाल दयाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासाठी आरसीबी संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, विराटने त्याचे खूप समर्थन केले आहे. जेव्हा यश आरसीबीमध्ये सामील झाला, तेव्हा विराट नेहमीच त्याला त्याच्या रूममध्ये बोलावून घेत,तसेच कधी तो स्वतः त्याच्या खोलीत जात होता. त्यांनी या विषयावर बोलत म्हटले, विराट यशला म्हणाला होता की, खूप मेहनत कर आणि चांगली गोलंदाजी कर, मी तुझ्यासोबत आहे. काळजी करू नकोस. कष्ट करणे थांबवू नकोस, चुका कर पण त्यातून काहीतरी शिक आणि पुढे चल. तसेच ते पुढे म्हणाले, विराटने यशला खूप मोकळेपणाची खेळण्याची सवलत दिली आहे आणि त्याला एक धाडसी खेळाडू बनवले आहे. तसेच ते विराट बद्दल पुढे म्हणाले, मी काही खेळाडूंना तुटताना पाहिले आहे, खास करून गोलंदाजांना पण विराटने यशला स्वतः सावरले आहे.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान आरसीबी विरुद्ध चेन्नईला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 15 धावांची गरज होती. त्याने पहिल्या 2 चेंडूत 2 धावा दिल्या. तसेच तिसऱ्या चेंडूवर त्याने एमएस धोनीला बाद केले. ज्यामुळे पूर्ण स्टेडियममध्ये आरसीबीच्या चाहत्यांना आनंद झाला. पण त्याच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार लागला, जो की नो बॉल ठरला. या चेंडूवर षटकार लागल्यानंतरही चेन्नईला 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. त्यानंतर यशने त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवत, पुढच्या 3 चेंडूत 3 जबरदस्त यॉर्कर टाकत त्यांना फक्त 3 धावा दिल्या आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---