---Advertisement---

चहलला पाहून रोहित म्हणाला, “याचे रेकाॅर्डिंग…” दोन्ही खेळाडूतील मैत्रीचा VIDEO एकदा पहाच..!

---Advertisement---

Rohit Sharma And Yuzvendra Chahal IPL 2025: सोमवारी (26 मे) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Punjab Kings vs Mumbai Indians) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने शानदार विजय मिळवला आणि क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. या सामन्याचा हीरो ठरला पंजाबचा जोश इंग्लिस. सामन्यानंतर मैदानात एक अत्यंत मजेशीर क्षण पाहायला मिळाले. त्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यातील मैत्री आणि त्यांची चेष्टा-मस्करी या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आली आहे. (Rohit Sharma and Yuzvendra Chahal’s friendship is on display once again)

सामना संपल्यानंतर चहल रोहित शर्माच्या दिशेने येत असताना, रोहितने मजेत कॅमेरामॅनला म्हटले, “याचं रेकॉर्डिंग करू नको आत्ताच यार” रोहितच्या या बोलण्यावर चहलनेही काहीतरी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर रोहित शर्माने हसून चहलच्या पायाला मजेत लाथ मारली त्यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओतून दोन्ही खेळाडूतील घट्ट मैत्री आणि मैदानाबाहेरचे बॉन्डिंग पुन्हा एकदा दिसून आले. क्रिकेटच्या मैदानावर गंभीर वातावरणातही खेळाडू असे आनंदी क्षण जगतात आणि ते चाहत्यांसाठी एक वेगळा आनंद घेऊन येतात, हेच या व्हिडिओतून दिसून येते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, चाहते यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Rohit Sharma And Yuzvendra Chahal Friendship)

सध्या पंजाबचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल बोटाच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे मागील 2 सामन्यात तो खेळताना दिसला नाही. चहल हा संघासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे जो संघाला कठीत परिस्थितीत देखील सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये चहल खेळताना दिसणार की नाही? हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---