इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआयने तत्काळ बैठक घेऊन आयपीएल २०२१ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद रिषभ पंतला देण्यात आले होते. रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्यास्थानी विराजमान आहे. परंतु, आयपीएलच्या उर्वरित सामन्यात त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात येऊ शकते.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा रिषभ पंतला देण्यात आली होती. ही जबाबदारी त्याने चोखपणे पार पाडली आहे. आयपीएलचा हंगाम स्थगित होण्यापुर्वी दिल्ली संघ १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. या संघाने एकूण ८ सामने खेळले आहेत. यात त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या माहितीनुसार, जर श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होईपर्यंत फिट झाला; तर तो उर्वरित हंगामात दिल्ली संघाचा कर्णधार असेल. श्रेयस अय्यर यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला वनडे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. याबरोबरच तो यंदाच्या आयपीएललाही मुकला होता.
आयपीएल २०२१चा हंगाम सुरू असताना श्रेयस अय्यरच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु आयपीएल खेळण्यापासून वंचित राहिलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या फिटनेसवर भरपूर जोर दिला आहे. लवकरच तो भारतीय संघाच्या आगमी श्रीलंका दौऱ्यावर खेळताना दिसू शकतो. अशात दिल्लीचे संघ व्यवस्थापनही आपल्या नियमित कर्णधाराला पूर्णपणे फिट झाल्याचे पाहून पुन्हा त्याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
हौसेला मोल नाही! लेकाच्या क्रिकेट प्रेमासाठी बापाने ५ एकर शेत उपसलं अन् दर्जेदार मैदान बनवलं
गरमागरमी! भर सामन्यात भिडले बांगलादेश आणि श्रीलंकाचे खेळाडू, रंगले शाब्दिक युद्ध
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय