दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात काल (22 जानेवारी) भारतीय संघाने ब्लोएमफोंटेन येथे झालेल्या जपान विरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने खिलाडूवृत्ती दाखवून जपान संघाबरोबर एक फोटोही काढला.
हा सामना संपल्यानंतर प्रियम गर्ग कर्णधार असणाऱ्या भारतीय संघाने जपानलाही ग्रुप फोटो काढण्यासाठी बोलावले होते. याआधी या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे भारतीय संघाने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीसाठी सध्या त्यांचे कौतुक होत आहे.
जपान आणि भारत युवा संघाचा एकत्र फोटो आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#SpiritOfCricket pic.twitter.com/L3GHkZPyNJ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
विशेष म्हणजे जपान पहिल्यांदाच विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्यांचा हा विश्वचषकाचा पहिलाच अनुभव आहे.
भारत विरुद्ध जपान संघात काल झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना 41 धावा केल्या होत्या आणि भारताला 42 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या 4.5 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.
या विजयामुळे भारताने अंतिम 8 संघातील स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने जपानच्या आधी श्रीलंका संघाला 90 धावांनी पराभूत केले होते. आता भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारीला होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध तो नाद विराट कोहली पुर्ण करणारच…
https://t.co/mKjdfegpkC#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
बीसीसीआयने करारबद्ध न केलेल्या धोनीला या ७ गोष्टीतून मिळणार तब्बल १३६ कोटी
वाचा👉https://t.co/tChPzC2qm1👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020