भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व वर्तमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वीच हृदयाच्या संबंधित आजारामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. सौरव गांगुली आता पूर्णतः स्वस्थ असून काही दिवसातच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील मिळणार आहे. अशातच बातमी समोर येत आहे की, फॉर्च्यून कुकिंग ऑइलने सौरव गांगुलींच्या सर्व जाहिराती हटवल्या आहेत. गांगुलींना हार्ट अटॅक आल्यामुळे सोशल मीडियावर फॉर्च्यून ऑइलला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते.
फॉर्च्यून ऑइलची मुख्य कंपनी आडानी विलमार लिमिटेड आहे. फॉर्च्यूनने आपले ऑइल हे हृदयासाठी उत्तम असल्याची जाहिरात केली होती. सौरव गांगुली फॉर्च्यूनची जाहिरात करताना, “चाळीशी नंतर जीवन जगणे सोडून द्याल का?”, अशा मथळ्याचा वापर करत होते. गांगुली आजारी असूनही फॉर्च्यूनच्या जाहिराती प्रदर्शित होत असल्यामुळे सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली जात होती.
इकोनॉमिक्स टाइम्समधील रिपोर्टनुसार कंपनीने सौरव गांगुली बरोबरच्या सर्व जाहिराती हटवल्या आहेत. कंपनी सध्या डॅमेज कंट्रोल रोखण्याच्या तयारीत असून यासंदर्भात नव्याने आखणी करणार आहे.
कंपनीचे सीईओ अंगुश मलिक म्हणाले, “आमचे राइस – ब्रेन ऑइल हे जगातील सर्वोत्तम ऑइल आहे. हे ऑइल बॅड- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते . सौरव गांगुली आमचे ब्रँड अँबेसिडर बनले व त्यांनी फॉर्च्यूनची जाहिरात देखील केली. इतरही अनेक कारणे हृदयाच्या संबंधित आजाराचे कारण बनू शकतात. गांगुली भविष्यात देखील आमच्या सोबत जोडलेले असणार आहेत.”
दरम्यान सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून, येत्या काही दिवसातच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल
जेमिसनच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजाचे लोटांगण, ११ विकेट्स घेत केली दिग्गजाची बरोबरी
अजून एक दिवस सौरव गांगुलीला डिस्चार्ज मिळणार नाही; काय आहे कारण, घ्या जाणून