आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. आता आयपीएल संपल्यानंतरी वेंकटेश अय्यरचे उत्कृष्ट प्रदर्शन चालूच आहे. अय्यर सध्या सय्यद मुश्ताक आली ट्रॉफीमध्ये मध्यप्रदेश संघासाठी खेळत आहे. त्याने या स्पर्धेत बिहारविरुद्ध कमाल प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात २ धावr देऊन २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीमध्ये २० चेंडूत ३६ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
हा सामना दिल्लीमध्ये खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला बिहारने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात कुलदीप सेनने पहिली विकेट घेतली. मंगल गहरोर फक्त ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर बिहारचे एकापाठोपाठ एक विकेट्स पडत गेले. यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उत्कृष्ट गोलंदाजी करणारा आवेश खान आणि दुसऱ्या बाजूने केकेआरच्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त गोलंदाजी केली.
या सामन्यात अय्यरने यशश्वी ऋषव (१) आणि शेखर कुमार (०) यांना स्वस्तात बाद करून बिहारची मधली फळी कमजोर केली. त्यानंतर आवेश खान आणि मिहिर हिरवानीने बाकीच्या खेळाडूंना बाद केले आणि बिहारला अवघ्या ५९ धावांवर सर्वबाद केले. बिहारसाठी त्यांचे केवळ तीन फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले. अय्यरने त्याच्या चार षटकांमध्ये २२ चेंडू निर्धाव फेकले आणि दोन चेंडूंवर दोन धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.
अय्यने यानंतर फलंदाजीमध्येही महत्वाची खेळी केली. त्याने आणि कुलदीप गेहीने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. कुलदीपने १४ चेंडूत २१ धावा केल्या आणि तो बाद झाला. अय्यरने २० चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.
अय्यर ज्याप्रकारचे प्रदर्शन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये करत आहे. त्यानंतर त्याने १७ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेत संधी मिळण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघांतील दिग्गजांनी विश्रांती देऊन युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. अशात अय्यर या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या ‘या’ तीन खेळाडूंनी टी२० विश्वचषकात केली सर्वाधिक निराशा
“भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झाला पाहिजे होता.”
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार, एक नजर त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त वक्तव्यांवर