-अनिल भोईर
इंडोनेशिया येथे होण्याऱ्या १८ व्या आशियाई गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाचे नेतृत्व चढाईपटू अजय ठाकूर करणार आहे. ज्या कबड्डी खेळात भारताचे वर्चस्व आहे त्यामध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी कर्णधार अजय ठाकूर तयार आहे.
आशियाई गेम्समध्ये कबड्डी खेळात भारताला प्रबळ दावेदार आहे. भारतीय पुरुष कबड्डी संघाचे नेतृत्व आक्रमक व चपळ खेळाडू अजय ठाकूरकडे असणार आहे.
मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये अजय ठाकुरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. तसेच दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व अजय ठाकूरने केले होते.
कबड्डी वर्ल्डकप २०१६ चा अजय ठाकूर हिरो ठरला होता. अंतिम सामन्यात इराण विरुद्ध सुपरटेन करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. प्रो कबड्डीत अजय ठाकूर तमिळ थालवाजचे नेतृत्व करत आहे.
अजय ठाकूरबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी-
-अजय ठाकूर हा हिमालय प्रदेशमधील नालागड जिल्ह्यातील असून त्याचा जन्म मे १९८६ साली झाला आहे. त्याचे वडील कुस्तीपटू व प्रशिक्षक होते. वयाच्या १० व्या वर्षांपासून अजय ठाकुरने कबड्डी खेळायला सुरुवात केली.
-१४ वर्ष व्यवसायिक कबड्डी खेळण्याचा अनुभव असलेल्या अजय ठाकुरने पहिलं आंतराष्ट्रीय सुवर्णपदक २००७ साली आशियाई इंडोर गेम्समध्ये मिळवल होत. २०१६ च्या कबड्डी विश्वचषकात अजय ठाकुरची मोलाची भूमिका होती.
-गोरगाॅन, इराण येथे झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०१७ मध्ये अजय ठाकूरने पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले, त्यानंतर कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ च्या स्पर्धेत नेतृत्व केले.
-प्रो कबड्डीतील सर्व हंगामात अजय ठाकूर खेळला असून पहिल्या दोन हंगामात बेंगळुरू बुल्स तर तिसऱ्या व चौथ्या हंगामात पुणेरी पलटण संघात खेळला आहे. पाचव्या हंगामात तामिळ थालवाज नवीन संघाने अजय ठाकूरला आपल्या संघात घेतले.
-शरीरयष्टीने उंच असलेल्या अजय ठाकुरची फ्लाइंग जंप ही कबड्डीत प्रसिद्ध आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–उपकर्णधार रहाणे शेवटच्या रांगेत तर अनुष्का शर्मा पहिल्या, चाहत्यांकडून जोरदार हल्लाबोल
–वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी
–बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता