भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या मानाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू आहेत. 20 डिसेंबरपासून मुंबई आणि हैद्राबाद यांच्यात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सामना खेळला जात आहे. यामध्ये मुंबईने पहिल्याच डावात फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामध्ये तीन खेळाडूंंनी शतकी खेळी केली आहे. ज्यामध्ये यशस्वी जायसवालचे दीडशतक आणि सरफराज खान नाबाद शतकी खेळी केली आहे. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या खेळीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मंगळवारी (20 डिसेंबर) नाबाद शतकी खेळी करत खेळपट्टीवर टिकून होता. त्या खेळीचे त्याने द्विशतकात रुपांतर केले आहे. तो 261 चेंडूत 204 धावा करत तंबूत परतला. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 78.16 एवढा होता. ही अप्रतिम खेळी करत त्याने भारताच्या कसोटी संघात परतण्यास आपली दावेदारी मजबूत केली आहे.
भारताचा एकेकाळचा स्टार फलंदाज रहाणेने ऑस्ट्रेलियात नेतृत्व करताना यजमानांना कसोटी मालिकेत 2-1 असे पराभूत केले होते. या मालिकेनंतर तो आऊट ऑफ फॉर्म होता. यामुळे त्याला संघातून वगळले गेले. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारीमध्ये (2022) खेळला होता. त्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने केवळ 10 धावाच केल्या होत्या. यामुळे निवडकर्त्यांनी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर केले. त्यानंतर तो स्थानिक क्रिकेटमध्येही चमकला नाही, याचा परिणाम म्हणून त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात जागा मिळाली नाही.
रहाणेचे हे या वर्षातील दुसरे द्विशतक आहे. याआधी त्याने दिलीप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनकडून खेळताना नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने 264 चेंडूत 207 धावा केल्या होत्या.
या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकली होती आणि मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. मुंबईचा पहिल्या डावाचा धावफलक पाहिला तर हैद्राबादचा निर्णय चुकल्याचे दिसत आहे. यावेळी मुंबईचे फलंदाज धडाकेबाज खेळी करत असून गोलंदाज कशी कामगिरी करतील याकडे लक्ष असेल. Ajinkya Rahane double century in Ranji Trophy 2022-23 MUMvsHYD
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाचा आयपीएलमध्ये नवा ‘अवतार’, ‘या’ भुमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘तो आमचा कर्णधार आहे आणि राहणारच’, बाबर आझमच्या समर्थनास पाकिस्तानी खेळाडूचे संतप्त ट्वीट