बेंगलोर | भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आज, १९ जून रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगलोर येथे यो यो टेस्टला सामोरे जाणार आहे. भारतीय संघातील इंग्लंड दौऱ्यावर जाणारे अन्य खेळाडू या टेस्टला यापुर्वीच सामोरे गेले आहेत.
यात अंबाती रायडू हा यापुर्वी ही टेस्ट फेल झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता सुरेश रैनाची निवड झाली आहे.
जर रोहीत आज ही टेस्ट फेल झाला तर त्याला स्टॅड बाय खेळाडू म्हणुन अजिंक्य रहाणेकडे पाहिले जात आहे. या टेस्टमध्ये पास होण्यासाठी १६.१ गुणांची गरज असते.
१९ तारखेला ही टेस्ट व्हावी म्हणुन रोहितने यापुर्वीच बीसीसीआयची परवानगी घेतली होती. तो जेव्हा अन्य खेळाडूंनी ही टेस्ट दिली तेव्हा फूटबाॅल विश्वचषकाचा सामना पहाण्यासाठी रशियाला गेला होता.
काही माध्यमातील वृत्तांनुसार रोहित आयपीएलच्या वेळी दोन वेळा यो यो टेस्ट फेल झाला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे बॅकअप म्हणुन पाहिले जात आहे. तसेच त्याला बीसीसीआयने पुर्ण तयारीत रहायला सांगितले आहे.
गेल्याच आठवड्यात मोहम्मद शमी (अफगाणिस्तान कसोटी), अंबाती रायडू (इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका) तसेच संजू सॅमसन (इंग्लंड अ मालिका) यांना संघातून वगळण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
–तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात