भारतीय देशांतर्गत क्रिकटमध्ये सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. आयपीएलमध्ये खेळलेले अनेक खेळाडू या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. यापैकीच एक आहे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे. आयपीएल २०२१ हंगाम संपल्यानंतर अजिंक्य मुंबई संघासोबत जोडला गेला. तो सध्या मुंबई संघासाठी मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई संघ चांगले प्रदर्शन करत आहे. तसेच त्याचे वैयक्तिक पातळीवरील प्रदर्शनही सुखावणारे आहे.
मुंबई संघाने स्पर्धेतील त्यांचे साखळी फेरीचे पाचही सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांपैकी संघाने तीन सामन्यात विजय मिळवला आहे. या तीन सामन्यात मिळालेल्या विजयांच्या जोरावर मुंबई संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की करेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईने त्याच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला असून ते सामने खूप कमी अंतराने गमावले आहेत. मुंबईने कर्नाटकविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ९ धावांनी पराभव पत्करला, तर चंदिगडसोबत खेळलेल्या सामन्यात संघाला विजयासाठी अवघी १ धाव कमी पडली.
या स्पर्धेत अजिंक्य रहाणेने त्याच्या संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्याने स्पर्धतील पहिल्या सामन्यात ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र, अजिंक्य दुर्दैवाने बाद झाला, त्याने या सामन्यात १६ चेंडूत १७ धावा केल्या होत्या. चौथ्या सामन्यात अजिंक्य पुन्हा त्याच्या लयीत दिसला आणि ५५ चेंडूत ६९ धावा केल्या. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्याने बडोदा संघाविरुद्ध ४५ चेंडूत ७१ धावा केल्या आहेत.
अजिंक्यने या स्पर्धेत चार अर्धशतक केले आणि त्याच्या जोरावर त्याने एकूण २८६ धावा केल्या आहेत. तो या यावर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अजिंक्यनंतर आंध्र प्रदेशचा अश्विन हेब्बर आहे, ज्याने आतापर्यंत २७९ धावा केल्या आहेत. तसेच चंदिगडचा मनन वोहरा २७३ धावा करून तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने आतापर्यंत २५९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! अय्यर आधी आयपीएलमध्ये चमकला आता एकाच सामन्यात २२ डॉटसह घेतल्या २ विकेट्स अन् ठोकल्या ३६ धावा
भारतीय संघाच्या ‘या’ तीन खेळाडूंनी टी२० विश्वचषकात केली सर्वाधिक निराशा
“भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झाला पाहिजे होता.”