---Advertisement---

विश्वविजेता भारतीय अष्टपैलू बनला दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक; प्रथमच आजमावणार प्रशिक्षणात हात; कैफला डच्चू

delhi-capitals
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) प्रमुख संघ दिल्ली कॅपिटल्स गेल्या काही हंगामात अनेक वेळा विजेतेपद पटकावण्याच्या जवळ पोहोचलेला आहे. परंतु, त्यांचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी त्यांनी लिलावात मजबूत संघ बनवला आहे. त्याच वेळी, संघाने आता आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत आणि विजेतेपदासाठी अनुभवी खेळाडूचा समावेश केला आहे. माजी भारतीय गोलंदाज अजित आगरकर हे दिल्ली कॅपिटल्सचे नवे सहाय्यक प्रशिक्षक असतील. त्यांच्या आधी ही जबाबदारी मोहम्मद कैफच्या हाती होती.

कैफला २०१९ मध्ये संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्याचा करार २०२१ पर्यंतच होता. बातम्यांनुसार, दिल्ली कॅपिटल्स संघ कैफच्या कामगिरीवर फारसा खूश नाही. हेच कारण आहे की, त्यांनी त्याच्यासोबतचा करार पुढे वाढवला नाही. याशिवाय सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या अजय रात्रा यांच्या कराराची मुदतही वाढवण्यात आलेली नाही. अजित आगरकर आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. आगरकर यांनी याच संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. आता तो येथूनच प्रशिक्षकपदाचा प्रवास सुरू करणार आहेत.

या दिवशी होणार संघात सामील
माध्यमांतील वृत्तानुसार , आगरकर यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणाही केली जाईल. दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगकडे आहे आणि आता अजित आगरकर देखील त्या संघाचा एक भाग असतील. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी प्रवीण आमरे यांच्याकडे आहे. तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जेम्स होप्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत-श्रीलंका मालिकेनंतर आगरकर दिल्ली संघात सामील होणार आहेत. कारण, ते या मालिकेत समालोचन करताना दिसणार आहेत. मालिका १६ मार्च रोजी संपेल. त्यानंतर आगरकर दिल्ली संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होतील.

शानदार राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
आगरकर हे भारतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि २००७ मध्ये शेवटचा सामना खेळला. २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. ते २०१३ पर्यंत आयपीएलमध्ये खेळत राहिले आणि शेवटी त्याच वर्षी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. ४४ वर्षीय अजित आगरकर प्रथमच कोचिंगमध्ये हात आजमावणार आहे. आगरकर यांनी निवृत्तीपूर्वी वनडेत २८८ आणि कसोटीत ५८ बळी घेतले होते. २०१२-२०१३ च्या आपल्या अखेरच्या रणजी हंगामात त्यांनी प्रथमच मुंबई संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजेता बनविण्यात मोलाची भूमिका बजावली. आगरकर २००८ ते २०१० पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळले. २०११ ते २०१३ दरम्यान तीन वर्षे ते दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचा भाग होते.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला दुहेरी धक्का! चहरपाठोपाठ फॉर्मात असलेला सूर्यकुमार दुखापतग्रस्त; टी२० मालिकेतून झाला ‘आऊट’ (mahasports.in)

श्रीलंकेविरुद्ध ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन; तीन बडे खेळाडू करणार पुनरागमन (mahasports.in)

श्रीरामचे देशप्रेम! ऑस्ट्रेलियन संघासह पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास श्रीधरन श्रीरामचा नकार (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---