मोबाईल, टिव्ही या मनोरंजनाच्या साधनांव्यतिरिक्त खेळ हा देखील मनुष्याच्या मनोरंजनाचा एक भाग आहे. फुटबॉल, हॉकी, टेनिस, गोल्फ, कुस्ती अशा अनेक क्रिडा प्रकारांमध्ये क्रिकेटही मोडते. बॅट-बॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे गडी या पुरेश्या साधनांसह कुठेही क्रिकेटचा डाव मांडता येतो. अगदी घरामध्ये क्रिकेटप्रेमी एका भितींला स्टंप आणि दाराच्या उंबरठ्याला क्रिजची दुसरी रेषा बनवून क्रिकेट खेळताना दिसतात.
असाच काही चिमुकल्या क्रिकेटप्रेमींनी चक्क मोठ्या पहाडीच्या एका कडेला क्रिकेटचा डाव मांडला असल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत, ‘क्रिकेटची अप्रतिम सेंटीग’, असे भन्नाट कॅप्शन त्यांनी दिले आहे.
या व्हिडिओत, मोठे कुर्ते घातलेले काही चिमुकले अतिशय नयनरम्य ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसत आहेत. एका मोठ्या पहाडीच्या बाजूवरील मोकळ्या पटांगणाला क्रिकेटच्या खेळपट्टीप्रमाणे तयार केले आहे. त्याच्या बाजूला मोठी दरी असून बाजूला बऱ्याच पहाडांची रांग असल्याचे दिसत आहे. त्या पटांगणावर फलंदाजी करत असलेला मुलगा जोरदार शॉट मारतो आणि त्याचा चेंडू पुढील पहाडांमध्ये दूरवर गेल्याचे दिसत आहे.
चोप्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने, “तो षटकार होता. आता चेंडू शोधायला सीआयडीला बोलवा”, अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने यमक जुळवत सुंदर अशी प्रतिक्रिया दिली आहे. “फिल्डर बने पहाड, पहाड बने फिल्डर”, अशी त्या वापरकर्त्याची प्रतिक्रिया आहे.
Wonderful setting for a game of cricket 🏏 #AakashVani pic.twitter.com/hfxcozjafn
— Aakash Chopra (@cricketaakash) January 14, 2021
https://twitter.com/OkayRushi/status/1349729247863009283?s=20
Fielder bane Pahad, Pahad bane fielder 🤟
— Made In Bikaner (@madeinbikaner) January 14, 2021
Nobody would dare to field on the off side! 😂
— Kuldeep Ashok Dubey (@imkuldeepdubey) January 14, 2021
Inke pass kitni ball hogi khelne ke liye 😂😂
— Brijesh Patel 🇮🇳 (@Brijeshpatelz) January 14, 2021
😄😄😀 Awesome location & commentary…
— Sumit Bisht (सुमित बिष्ट) (@SamBisht424) January 14, 2021
आकाश चोप्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सतत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटवर ते वेगवेगळ्या गुणवंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ शेअर करतात आणि सर्वांना त्यांची प्रतिभा दाखवतात. अशाप्रकारे नकळत चोप्रा हे मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-