लहान मुले शाळेत शिक्षकांना घाबरुन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसतात. पण थोड्या वेळासाठी शिक्षकांची नजर इकडेतिकडे झाली त्यांची चुळबूळ सुरु होते. त्यातही शिक्षक वर्गात नसतील किंवा सुट्टीवर असतील, तर त्यांच्या मस्तीची सीमा नसते. इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू ऍलेक्स हार्टले हिने भारतीय फलंदाज रिषभ पंत याच्या व्हिडिओला पाहून अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे.
झाले असे की, पंतने मंगळवारी (०५ जानेवारी) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत पंत जिममध्ये कोलांट्या उड्या घेताना दिसत आहे. त्याने एकापाठोपाठ एक सलग तीन कोलांट्या उड्या मारल्याचे यात दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने, “आज जिममध्ये खूप चांगला दिवस गेला”, असे कॅप्शन दिले आहे.
पंतच्या या व्हिडिओवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू ऍलेक्स हिने त्याची फिरकी घेतली. तिने पंतचा व्हिडिओ रिट्विट करत लिहिले की, “कर्णधार सुट्टीवर असला की मुले असाच धिंगाणा करणार. मला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला असेच कोलांट्या उड्या मारताना पाहायचे आहे.”
ऍलेक्सच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी विराटऐवजी विस्फोटक फलंदाज रोहित शर्माला कोलांट्या उड्या मारायला सांग, तो नक्कीच हे चॅलेंज पूर्ण करून दाखवेल, असे म्हटले आहे. तर काहींनी विराटला ऍलेक्सची मागणी पूर्ण करुन दाखवण्याची विनंती केली आहे.
Good day at the lab. 🔬 pic.twitter.com/EkgtYrjhri
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 5, 2021
When the captains away, the boys will play…
I want to see @imVkohli do this 👏🏽👏🏽👀 https://t.co/DodxCZoKvQ
— Alexandra Hartley (@AlexHartley93) January 5, 2021
https://twitter.com/VamshiMb/status/1346498755638349825?s=20
@ImRo45 will do it for you😎
— Virarsh (@Cheeku218) January 5, 2021
https://twitter.com/Sabari2412Hr/status/1346698729294741505?s=20
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असून ती जानेवारी महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी आपल्या पत्नीजवळ राहण्यासाठी विराटने पहिल्या कसोटी सामन्यानंतर पालकत्त्व रजा घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
विराटच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने भारतीय संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. यासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू येत्या तिसऱ्या कसोटी सामन्याची जोरदार तयारी करत आहेत. ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना होणार आहे. ११ जानेवारी रोजी हा सामना संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
इंस्टाग्रामवर विराटबरोबरचा तो फोटो पाहून भडकली अनुष्का; म्हणाली, ‘हे थांबवा आता’
तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेने ‘या’ दोन खेळाडूंचे केले तोंडभरुन कौतुक
सिडनी कसोटीत रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, रहाणेने केला खुलासा