इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १९वा सामना आज (५ ऑक्टोबर) दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. दोन्ही संघाचा हा या हंगामातील ५वा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरुवात होईल. मागील २ सामन्यात विजय मिळवलेला बेंगलोर संघ आजच्या सामना जिंकत विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. तर दिल्ली संघदेखील हंगामातील चौथा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
बेंगलोरविरुद्ध दिल्लीची आकडेवारी खूप खराब आहे. या दोन्ही संघातील गेल्या १७ सामन्यांविषयी बोलायचं झालं तर, दिल्ली संघाने फक्त ३ वेळा बेंगलोरला पराभूत केले आहे. त्यातील २ सामने गतवर्षी त्यांनी जिंकले होते.
दोन्ही संघांनी या हंगामात जिंकलेत ३-३ सामने
आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंयत दोन्ही संघांनी ४ सामने खेळले आहेत, त्यातील प्रत्येकी ३ सामन्यात त्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जो संघ आज सामना जिंकेल, तो गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावेल.
दोन्ही संघांनी या हंगामात मिळवलाय सुपर ओव्हरमध्ये विजय
दिल्लीचा आयपीएल २०२०मधील पहिला सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झाला होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये तो सामना जिंकला. तर दूसऱ्या बाजूला बेंगलोरने मुंबई इंडयिन्सविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.
दोन्ही संघातील सर्वात महागडे खेळाडू
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा त्यांच्या संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला यावर्षीच्या तब्बल १७ कोटींना मिळणार आहेत. त्याच्यानंतर एबी डिविलियर्स ११ कोटींसह बेंगलोरचा दूसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. दूसरीकडे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा दिल्ली संघाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला संघाने १५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर शिमरॉन हेटमायर याला देखील संघाने ७.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
कोहली, डिविलियर्स आणि पड्डीकलवर संघाची जबाबदारी
बेंगलोर संघाचा युवा फलंदाड देवदत्त पड्डीकल हंगामातील पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने ३ अर्धशतके लगावली आहेत. तर एबी डिविलियर्सचा फॉर्मदेखील चांगला चालू आहे. शिवाय कर्णधार विराट कोहलीने मागील सामन्यात ७२ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे हे ३ खेळाडू आज दिल्लीविरुद्ध शानदार फलंदाजी करण्याची अपेक्षा आहे.
शॉ, पंत आणि अय्यरदेखील आहेत चांगल्या फॉर्ममध्ये
दिल्ली संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यंदा शानदार फॉर्ममध्ये आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरदेखील चांगली फलंदाजी करत आहेत. अय्यरने मागील सामन्यात ८८ धावांची ताबडतोब खेळी केली होता. जर बेंगलोरविरुद्ध यांची फलंदाजी टिकली, तर आजचा सामन्यात दिल्लीचे पारडे जड होऊ शकते.
खेळपट्टी आणि हवामान रिपोर्ट
सामन्यादरम्यान दुबईतील तापमान २७ ते ३७ डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता आहे. दुबईतील खेळपट्टी फलंदाजांसाठी सोईची आहे. त्यामुळे फलंदाज मोठ्या धावा करताना दिसू शकतात. तर धिमी खेळपट्टी असल्यामुळे फिरकीपटूंनाही बराच फायदा होईल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ सुरुवातील फलंदाजी निवडण्यास प्राधान्य देईल. कारण यापुर्वी या मैदानावर झालेल्या ६१ टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी निवडणाऱ्या संघाची विजयी सरासरी ५५.७४ टक्के आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित प्लेइंग इलेव्हन
देवदत्त पड्डीकल, ऍरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, शिवम दुबे, गुरकिरत मान, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उडाना, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, युझवेंद्र चहल.
दिल्ली कॅपिटल्सचा संभावित प्लेइंग इलेव्हन
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, अमित मिश्रा, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL मध्ये खेचलेले लांबलचक अन् खणखणीत षटकार, पहिल्याने तर थेट मैदानाबाहेर टोलवलाय चेंडू
चेन्नईचे बादशाह! वॉटसन आणि डू प्लेसिस शिलेदारांनी सीएसकेसाठी केला ‘हा’ मोठा कारनामा
घासून नाय तर ठासून आलो!! चेन्नईचा पंजाबवर १० गडी राखून दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज, चारपैकी तीनही भारतीय फिरकीपटू
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
अवघड झालंय! ‘या’ ३ संघाचे आयपीएल प्ले ऑफचे मार्ग जवळपास बंद