---Advertisement---

AUS vs PAK । ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आमीरकडून वसीम अक्रमची बरोबरी, सिडनी कसोटी ठरली ऐतिहासिक

Aamer Jamal
---Advertisement---

पाकिस्तानचा अष्टपैलू आमीर जमाल याने आपल्या पदार्पणाच्या मालिकेत 18 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियात धूमाकूळ घातला. याबरोबरच पाकिस्तानला आणखी एक दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळाल्याची चर्चा सूरु झाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आमीरने एकूण 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या कामगिरीनंतर त्याच्या नावावर एक असा विक्रम झाला आहे जो आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला करता आला नव्हता. अष्टपैलू खेळाडू पदार्पणाच्या मालिकेत (तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेत) सर्वाधिक विकेट्स घेणारा पाकिस्तानी गोलंदाज बनला आहे.

सध्या सिडनीमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावात आमीर जमाल (Aamer Jamal) याने 21.4 षटकात केवळ 69 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासह आमीरने (Aamer) याने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. आपल्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला केवळ 299 धावाच करता आल्या. त्याआधी पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 313 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात आमीरच्या 83 धावांचा समावेश होता. त्याचबरोबर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सर्वाधिक 88 धावा केल्या होत्या. दुसरा डाव सुरू होण्याआधी पाकिस्तान संघ 14 धावानी पुढे होता.

या प्रदर्शनाच्या जोरावर आमीर तिसरा असा विदेशी खेळाडू ठरला, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना 125 धावा केल्या आणि 15 विकेट्सही घेतल्या. याआधी ही कामगिरी इयान बॉथम आणि पाकिस्तानच्याच वसिम अक्रम या दिग्गज खेळाडूंनीच केला होती. आपले अष्टपैलूत्व आमीरने त्याच्या पहिल्याच मालिकेत सिद्ध केले आहे. (Amir Jamal tied Wasim Akram’s record in the Sydney Test)

आमिरकडे पाकिस्तान क्रिकेट संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. पण हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. सिडनी कसोटीत अप्रतिम फॉर्म दाखवणारा आमीर देशासाठी खेळण्याआधी टॅक्सी चालक होता. हे काम करताना त्याने क्रिकेटला खंड पडू दिला नाही आणि अखेर राष्ट्रीय संघात स्थान पक्के केले.

पाकिस्तान (Pakistan) व्हाइटवॉश च्या उंबरठ्यावर
सामन्याचा विचार केला, तर तिसऱ्या दिवसाखेर पाकिस्तान संघ अडचणीत दिसत आहे. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात 7 विकेट्सच्या नुकसानावर 68 धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या 82 धावांची आघाडी पाहुण्या संघाकडे आहे. पण शेवटच्या तीन विकेट्स न गमावता संघाला अजून मोठा प्रवास पार करावा लागणार आहे. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाकिस्तानकडून मोठे लक्ष्य मिळाले नाही, तर यजमान संघाचा विजय जवळपास निश्चित आहे.

दुसऱ्या डावात आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी जॉश हेजलवूड याने 4 तर मिचेल स्टार्क (Mitchell Starc), नॅथन लायन आणि ट्रॅविस हेड (Travis Head) यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. चौथ्या दिवशी सुरुवातीच्या षटकांचा खेळ सामन्याची पुढची दिशा ठरवणारा असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---