भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रत्येक लहानसहान गोष्टींवर त्यांचे लक्ष असते. तसेच, त्यांचे क्रिकेटवरही तितकेच प्रेम आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलने केलेल्या कामगिरीनंतर त्यांनी अक्षरचे व त्याच्या गॉगलचे कौतुक केले होते. सोबतच त्यांनी भारतीय संघाने टी२० मालिका जिंकल्यानंतर एक विशिष्ट गोष्ट करण्याचा शब्द दिला होता. आता महिंद्रा यांनी तो शब्द पूर्ण केला आहे.
केले होते अक्षरचे कौतुक
भारतीय संघाचा युवा अष्टपैलू अक्षर पटेल याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २८ बळी मिळवत सर्वांची वाहवा मिळवली होती. सोबतच आनंद महिंद्रा यांनी अक्षरने वापरलेल्या गॉगलचे कौतुक केले होते. तसेच, आपल्यालाही असे गॉगल हवे आहेत असे ट्विट त्यांनी केलेले.
Ok. Done & dusted. Series win in the pocket. 👏👏👏Now I need to get these sunglasses to commemorate the victory. Which brand are they and where can I get them? pic.twitter.com/zp4bbyzPl8
— anand mahindra (@anandmahindra) March 6, 2021
मिळविले होते खास गॉगल
महिंद्रा यांनी या गॉगलबाबत ट्विट केल्यानंतर त्यांना ‘ओकली’ कंपनीने गॉगल भेट दिले होते. टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी ट्विट करत म्हटले होते, ‘मला हे अक्षरसारखे गॉगल मिळाले आहेत. आजचा सामना मी हे गॉगल घालून पाहिल. माझी बायको मला कदाचित वेडा म्हणेल. मात्र, तरीही मी हे गॉगल घालून सामना पाहणारच.’
I said I was going to get myself a pair of ‘Axar’s shades’ to commemorate the series win. Bought a pair (thanks Sporting Tool Relish!) & all set to watch the match tonight. I know, I know; no shades needed to watch TV & wife thinks I’m crazy but maybe it’ll be a good luck charm! pic.twitter.com/SKkE9z3D4N
— anand mahindra (@anandmahindra) March 14, 2021
त्यावर एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट करत म्हटलेले, ‘एक फोटो देखील पोस्ट करा.’ तेव्हा महिंद्रा यांनी उत्तर देताना म्हटले होते की, ‘भारताने टी२० मालिका जिंकल्यानंतर मी नक्की फोटो पोस्ट करेल.’
Sirji, I meant agar hum SERIES jeetenge! Let these shades prove they’re not just a ‘one-match wonder’ & will be lucky for the whole series…😊 https://t.co/DN0PSF6vBO
— anand mahindra (@anandmahindra) March 14, 2021
Agar jeetenge to post karenge https://t.co/nPjCwVZJeV
— anand mahindra (@anandmahindra) March 14, 2021
महिंद्रा यांनी पूर्ण केला दिलेला शब्द
भारतीय संघाने इंग्लंडला अखेरच्या टी२० सामन्यात पराभूत करून मालिका ३-२ अशा फरकाने आपल्या नावे केली. भारताच्या विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी ‘ते’ गॉगल घातलेला फोटो शेअर करत ट्विट करताना लिहिले, ‘मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. या ‘अक्षर’ शेड्सच्या गॉगल सोबतचा हा फोटो. हा माझा नवा लकी चार्म आहे.’
OK, have to fulfill a commitment. Here’s the promised selfie with my “Axar” shades…My new good luck charm that’s proven its worth…😊 pic.twitter.com/VdLSMCNkrs
— anand mahindra (@anandmahindra) March 21, 2021
यानंतर सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांचे कौतुक होत आहे. आनंद महिंद्रा हे प्रसिद्ध उद्योगपती असून ते सातत्याने वेगवेगळ्या खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रांनाही भुरळ पडलेल्या अक्षर पटेलच्या ‘त्या’ गाॅगलची किंमत नक्की आहे तरी किती?
अक्षर पटेलच्या सनग्लासेसची आनंद महिंद्रा यांना भूरळ! म्हणाले, ‘त्यांचा ब्रँड काय आणि कुठे मिळतील?’
ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ‘ही’ महागडी भेट