भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले होते. ज्यामधे दोन खेळाडूने कसोटी पदार्पण केले. त्याचबरोबर पदार्पणाच्या सामन्यातच या दोन गोलंदाजांनी प्रमुख गोलंदाजाच्या अनुपस्थित चांगली कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे सहाय्यक प्रशिक्षक एॅन्ड्र्यू मॅकडोनाल्डने या नवोदित गोलंदाजाबद्द्ल प्रतिक्रिया देताना कौतुक केले.
ऑस्ट्रेलिया संघाचे सहाय्यक प्रशिक्षक एॅन्ड्र्यू मॅक्डोनाल्ड यांनी चौथ्या कसोटी सामन्यात नवोदित गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. खासकरून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरबद्दल बोलताना म्हणाले, “या युवा फिरकीपटूने आर अश्विनच्या जागी उतरताना खूप चांगली गोलंदाजी केली.” या मालिकेत खेळाडूंना झालेल्याला दुखापतीमुळे शुक्रवारी भारतीय संघात पदार्पण करणार्या वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांना प्लेईंग इलेव्हन मध्ये संधी दिली.
हे दोन गोलंदाज भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून सहभागी झाले होते. एॅन्ड्र्यू मॅक्डोनाल्ड हे दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा म्हणाले, “मला वाटले की ते खूप सातत्यपूर्ण राहिले. मला खासकरून वॉशिंग्टन सुंदर खूप अनुशासित वाटला. त्याने अश्विनच्या जागी आपली भूमिका योग्य भूमिका पार पाडली. तसेच त्याने अनुभवी गोलंदाजाप्रमाणे प्रदर्शन करताना विकेट्स सुद्धा घेतल्या.”
आयपीएल मध्ये प्रशिक्षक असणारे एॅन्ड्र्यू मॅक्डोनाल्ड यांनी वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्या गोलंदाजाचे सुद्धा कौतुक केले. त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीने सर्वच प्रभावित झाले.
एॅन्ड्र्यू मॅक्डोनाल्ड म्हणाले,” मला वाटते तो असा गोलंदाज आहे, जो खेळावर लगाम लावण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे मी त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झालो. त्याला भलेही अनुभव नाही. मात्र तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याअगोदर भरपूर प्रमाणात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे हा चांगला पर्याय. यासाठी मला वाटते त्यांनी चांगली कामगिरी केली.”
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 369 धावसंख्येवर रोखला. ज्यामधे नटराजन, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या:
ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या या दोन चुका
रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर अशा आल्या प्रतिक्रिया