भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आयसीसी क्रिकेट कमिटीच्या अध्यक्षपदी पून्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या त्रिमासिक बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कुंबळेचा या पदावर पुढील तीन वर्षे असा कार्यकाळ असेल.
याआधी कुंबळेने या पदाची जबाबदारी 2012 ला स्विकारली होती. त्यानंतर 2016 ला त्याने दुसऱ्यांदा ही जबाबदारी स्विकारली. यापदावर तो 2018 पर्यंत होता. आता पुन्हा एकदा या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे.
ही कमिटी काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या काही नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या निर्णयामुळे चर्चेत होती. कुंबळेच्या अध्यक्षतेखालीही या समितीने काही महत्त्वाचे निर्णय याआधी घेतले आहेत. यात कसोटीमध्ये नाणेफेक हा अविभाज्य भाग असेल या निर्णयाचा समावेश आहे. तसेच या कमिटीने चेंडू छेडछाडीसाठी कठोर शिक्षा असावी अशी शिफारसही केली होती.
कुंबळे अध्यक्ष असताना या कमिटीची मे 2018मध्ये दोन दिवसीय बैठकही झाली होती. ज्यामध्ये अगामी कसोटी चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंची वागणूक आणि खेळाची परिस्थिती यावर चर्चा झाली होती.
तसेच या कमिटीने जूलै 2019 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियशिपसाठी गुणपद्धती असावी अशी शिफारस केली आहे.
कुंबळेची 2016मध्ये भारतीय वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने नियुक्ती केली होती. परंतू भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर झालेल्या वादामुळे कुंबळेने 2017 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
–राजकोट बाॅय रविंद्र जडेजाच्या पत्नीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
–धोनी जे काही करायला सांगतो ते मी डोळे झाकून करतो – केदार जाधव
–विराट, शमीने एकमेकांना दिली नवीन टोपन नावे, वाचा