क्रिकेट हा खेळ एक दिवस तुम्हाला राजा बनवतो, तर एक दिवस रंक करतो. अशी एक घटना सध्या भारतात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बघायला मिळाली. ही घटना केरळ संघाचा फलंदाज मोहम्मद अजहरुदीन सोबत घडली. मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे त्याचे नाव चर्चेत आले होते.
त्यानंतर दिल्ली विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात तो पूर्णपणे कमनशिबी ठरला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात केरळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अणि दिल्ली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना केरळ संघाची जोरदार धुलाई केली. दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 212 धावा कुटल्या.
त्यानंतर केरळ संघाकडून फलंदाजी करायला मोहम्मद अजहरुदीन आणि रॉबिन उथप्पा सलामीला आले होते. मागच्या सामन्यात दमदार कामगिरी करणार्या मोहम्मद अजहरुदीनकडून, प्रेक्षकांना आणि केरळ संघाला पुन्हा एकदा त्या दमदार खेळीची अपेक्षा होती. परंतु संघाचे पहिले षटक टाकायला आलेल्या इशांत शर्माने त्याला आपल्या तिसर्या चेंडूवरच त्याला बाद केले. त्यामुळे सर्व चाहत्यांना आणि केरळ संघाच्या पदरी निराशा आली.
ही विकेट खरंतर दिल्ली संघाचा यष्टिरक्षक अनुज रावतच्या खात्यात जमा करायला हवी. कारण त्याने ज्या प्रकारे अफलातून झेल घेतला, त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली. जरी अझरुद्दीन पहिल्याच चेंडूवर खाते ही न उघडता बाद झाला, तरी हा सामना मात्र केरळ संघाने 6 विकेट्सने जिंकला.
Extra ordinary catch 👏👏 @AnujRawat_1755
Wicket Keeping skill too is handy in T20 matches as well !! #AjayRatra #AnujRawat #WicketKeeper #DivingCatch #DELHIvsKERALA #SMAT @BCCIdomestic pic.twitter.com/PbzS9tLCcI
— Ajay Ratra (@ajratra) January 15, 2021
ICYMI: Anuj Rawat's stunning one-handed grab 👏👏
The Delhi wicketkeeper threw towards his right and took a sensational catch off Ishant Sharma's bowling. 👌👌 #DELvKER #SyedMushtaqAliT20
Watch that catch 🎥👇https://t.co/ZGQgIj1IMp pic.twitter.com/02VApSh9Zq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 15, 2021
https://twitter.com/ChacharAwais/status/1350023596396208128
केरळ संघ 213 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला. सगळ्याना वाटले असेल की हा सामना जिंकणार नाही कारण या संघाचा मोहम्मद अजहरुदीन शून्यावर बाद झाला होता. मात्र तरी ही केरळ संघाने हा 19 षटकांत 4 गडी गमावून 218 धावा करत जिंकला. केरळ संघाकडून सर्वाधिक धावा रॉबिन उथप्पाने केल्या. त्याने 54 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकार खेचत 91 धावांची खेळी साकारली. दिल्ली संघाकडून पवन नेगी वगळता इतर प्रत्येक गोलंदाजाने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी दिल्ली संघाकडून फलंदाजी करताना शिखर धवनने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 3 षटकार यांच्या मदतीने दमदार खेळी केली. त्याचबरोबर नितीश राणाने नाबाद 52 धावांची खेळी केली. केरळ संघाकडून सर्वाधिक विकेट्स श्रीसंतने घेतल्या. त्याने 46 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS v IND : कसोटी मालिकेत चारही सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचा होऊ शकतो ‘असा’ ११ जणांचा संघ
ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज
…म्हणून नॅथन लायनला चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने दिला गार्ड ऑफ ऑनर