बुधवारी बीसीसीआयने लंडंनमधील भारतीय दुतावासातील भारतीय संघाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. यामुळे अनेक चाहत्यांनी यावर टीका केली आहे.
परंतू अनुष्काचे या फोटोत उपस्थित असण्याचे खरे कारण समोर आले आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाच्या एका आधिकाऱ्याने सांगितले की, ‘ग्रुप फोटो काढण्यासाठी कोणतेही नियम नव्हते. प्रत्येकजण आपल्या पसंतीने उभे राहीले होते.’
‘पहिल्यांदा अनुष्का त्या फोटोत नव्हती पण उच्चआयुक्त यश सिन्हा यांची पत्नी गिरीजा सिन्हा यांनी अनुष्काला बोलावून घेतले. कारण त्या फोटोत त्यांच्याव्यतिरिक्त कोणतीही महिला नव्हती.’
‘भारतीय संघाला भारतीय दुतावासात स्नेहभोजनाचे आमंत्रण उच्चआयुक्त आणि त्यांच्या पत्नीने दिले होते. यावेळी त्यांनी अनुष्कालाही आमंत्रण दिले होते. हे कार्यक्रम भारतीय दुतावासाकडून नव्हता तर उच्चआयुक्त यांनी आयोजीत केला होता.’
याबरोबरच या फोटोमध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा होता. त्यामुळेही बीसीसीआयवर टीका करण्यात आली होती.
#TeamIndia members at the High Commission of India in London. pic.twitter.com/tUhaGkSQfe
— BCCI (@BCCI) August 7, 2018
याविषयी सुत्रांनी सांगितले की, ‘ग्रुप फोटो आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर काढण्यात आला होता. रहाणे त्याच्या मर्जीने मागे उभा होता. हा कार्यक्रम दुतावासात नाही तर उच्चआयुक्तांच्या घरी आयोजीत करण्यात आला होता.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार
-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!
-विराट सोबतचा फोटो शेअर करत पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत:लाच केले ट्रोल