क्रिकेटविश्वात अनेक खेळाडूंना लहान- मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागत असते. काही दुखापती लवकर बऱ्या होतात तर काहींना दीर्घकाळ लागतो. आता अशाच प्रकारची दुखापत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) झाली आहे. याचा मोठा धक्का इंग्लंडला बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. काल (5 जानेवारी) ब्रिटनमध्ये आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याची तपासणी केली असता त्याला लो ग्रेड स्ट्रेस फ्रॅक्चर (Low Grade Stress Fracture) झाल्याचे समोर आले.
त्यामुळे आता आर्चर 2020मध्ये होणाऱ्या श्रीलंका (England Tour of Sri Lanka) दौऱ्यावरील कसोटी मालिका (Test Series) आणि आयपीएल (IPL) स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
उन्हाळ्यात जूनमध्ये विंडीजविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार होण्याच्या दृष्टीणे आर्चर आता रिहॅबिलिटेशनसाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या वैद्यकीय पथकाबरोबर जाणार आहे.
आर्चरने आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 27.4 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतले आहेत. यामध्ये त्याने एका डावात 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
बापाचे स्वप्न मुलाने केले पूर्ण; भारतीय क्रिकेटमधील ही आहे मोठी घडामोड…
वाचा- 👉https://t.co/CUa1MUqSWh👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 6, 2020
चक्क! 'कॅप्टन कूल' आपल्या संघसहकाऱ्यांना खाऊ घालतोय पाणी-पुरी; पहा व्हिडिओ…
वाचा- 👉 https://t.co/0OX5NWc9Yd👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) February 6, 2020