सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला सुरुवात होईल. ही स्पर्धा १० जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच राज्य क्रिकेट संघटना तयार आहेत. बऱ्याच राज्यांनी या स्पर्धेसाठी आपापल्या संघांची घोषणा देखील केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील २६ डिसेंबर,२०२० रोजी आपला संघ जाहीर केला होता. मात्र त्यावेळेस २१ वर्षीय अर्जून तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण आता अर्जूनला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे.
मीड-डे ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने संघांत २२ जणांना सामील करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जूनला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड होण्याची अर्जूनची ही पहिलीच वेळ आहे.
अर्जूनने काहीदिवसांपूर्वी मुंबई खेळाडूंदरम्यान झालेल्या ४ सराव सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ७ धावा केल्या होत्या.
अर्जूनने याआधी वयोगटातील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९ वर्षांखालील भारतीय संघाकडूनही तो कसोटी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने अनेकदा भारत आणि इंग्लंड संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी केली आहे.
या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करणार आहे. तर आदित्य तरे उपकर्णधार असेल. तसेच या संघात यशस्वी जयस्वाल, धवल कुलकर्णी, शिवम दुबे, सर्फराज खान, सिद्धेश लाड असे काही स्टार खेळाडूही आहेत.
असा आहे मुंबई संघ –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मीनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अतरदे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर, सुफियान शेख, अर्जुन तेंडुलकर, कृतिक हणगावडी.
महत्त्वाच्या बातम्या –
नववर्षाचा शुभारंभ! ‘या’ क्रिकेटरने प्रेयसीसोबत केला साखरपुडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
“विसरू नका, ते दोघेही भारतीय आहेत”, ‘त्या’ दोन क्रिकेटर्सच्या तुलनेवर मास्टर ब्लास्टरचे भाष्य
माझाचं उत्साह नडला, पंतने असं काही केलंच नाही! चाहत्याने माफी मागत दिले स्पष्टीकरण