कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) हंगामाला मे महिन्याच्या सुरुवातीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता आयपीएलचे उर्वरित २०२१ हंगाम १९ सप्टेंबर पासून यूएई येथे होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील खेळाडू तयारीला लागले आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सचा खेळाडूंनी देखील सरावाला सुरुवात केली आहे.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकर जो की, सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे, त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात तो नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. सरावादरम्यान अर्जुन तेंडुलकरने अप्रतिम असे शॉट मारले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून त्याच्या फलंदाजीची झलक दिसून येते.
अर्जुन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ५ व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात त्याने ५ वेगवेगळ्या गोलंदाजी प्रकारावर ५ वेगवेगळे शॉट्स मारलेले आहेत. यावरून अर्जुनच्या क्रिकेट कौशल्याचे दर्शन घडून येते. अर्जुन फलंदाजीसोबत गोलंदाजी ही करतो. तो एक अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी ही त्याची प्रमुख ताकद आहे. मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखाच्या रकमेत आपल्या संघात सामील केले होते.
अर्जुनला आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु, त्याच्या खेळण्याची शैली पाहता, लवकरच त्याला आयपीएलच्या उर्वरित सत्रात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात एकूण २९ सामने झाले होते. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स ७ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह गुणतालिकेत ४ थ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित सत्रातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यात होणार आहे
महत्वाच्या बातम्या –
–“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा
–इंग्लंडचा २०१८ चा दौरा अपयशी ठरला, पण यंदा ‘हे’ ध्येय मनाशी पक्कं करुन आलोय, केएल राहुलने व्यक्त केला विश्वास
–न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल; देतोय मृत्यूशी झुंज