---Advertisement---

अर्शदीपच्या यशामागे आहे हा अदृश हात! स्वतः केलाय खुलासा

arshdeep singh
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देत गुणतालिकेत अव्वल स्थानी नेले.

भारतीय संघाला या सामन्यात पराभूत व्हावे लागले असले तरी, संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचे विशेष कौतुक केले जात आहे. भारताच्या तीनही सामन्यात तो सर्वोत्तम गोलंदाज म्हणून समोर आला. त्याने आपल्या या यशाचे श्रेय आपलाच संघ सहकारी असलेल्या भुवनेश्वर कुमार याला दिले आहे.

अर्शदीप सिंग हा आपला पहिलाच विश्वचषक खेळतोय. जबाबदारीने खेळ दाखवत केवळ 23 वर्ष वय असलेल्या अर्शदीपने तीन सामन्यात मिळून सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तीन, नेदरलँड्सविरूद्ध दोन व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन बळी त्याने आपल्या नावे केले. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपने जुलै महिन्यात भारतासाठी पदार्पण केले होते.

आपल्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय त्याने संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,

“आम्ही विरोधी गोलंदाजांच्या कमजोरी शोधण्याचा प्रयत्न करतो. चेंडू स्विंग करण्यावर आमचा भर आहे. मी यशस्वी होतो आहे कारण, भुवी फलंदाजांवर दबाव टाकतोय. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे फलंदाज दडपणाखाली येतात. त्यामुळेच दुसऱ्या बाजूने मला बळी मिळत आहेत. माझ्या यशाचे श्रेय त्याला जाते.”

भुवनेश्वर कुमार याने या विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सर्वसामान्यांमध्ये अत्यंत कंजूस गोलंदाजी करत प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---