आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामापूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. तत्पूर्वी सर्व संघांनी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. पण पंजाबने केवळ 2 अनकॅप्ड खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामध्ये शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग या खेळाडूंचा समावेश आहे. 2019 पासून संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही (Arshdeep Singh) पंजाबने सोडण्याचा निर्णय घेतला.
शशांक सिंग (Shashank Singh) आणि प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) यांना रिटेन केल्यानंतर पंजाब किंग्जकडे (Punjab Kings) 110.5 कोटी रुपये आणि 4 आरटीएम कार्ड उपलब्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, पंजाब किंग्स अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) कायम ठेवण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च करण्याच्या मूडमध्ये नव्हते. पण असे मानले जाते की, संघ आरटीएमद्वारे अर्शदीपला विकत घेऊ इच्छित आहे. पण आयपीएल लिलावापूर्वी अर्शदीप सिंगने एक धक्कादायक गोष्ट केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप सिंगने पंजाब किंग्जला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि संघासोबतचे अनेक फोटोही डिलीट केले आहेत. अर्शदीपने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी चमकदार कामगिरी केली आहे, त्याने 2024च्या आयपीएल हंगामात एकूण 19 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंगबद्दल (Arshdeep Singh) बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत 8 एकदिवसीय आणि 56 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात 12 आणि टी20 मध्ये 87 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपने 2024च्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर आयपीएलच्या 65 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 76 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय फलंदाज
भारताच्या पराभवानंतर अनोखी मागणी, टेस्ट फॉरमॅटमध्ये होणार बदल? भारतीय दिग्गजानी उठवला आवाज
ऑलिम्पिक पदक जिंकणारी महिला बॉक्सर इमान खलीफ ‘पुरुषचं’! वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा