पुणे: पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत आर्य स्पोर्टस् संघाने मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाचा तर प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने शिवनगर क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बालाजी पवारच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाने 6 षटकात 4बाद 52 धावा केल्या. 52 धावांचे लक्ष बालाजी पवारच्या 19, वौभव पांडूलेच्या 18 व राजेंद्र पानेसरच्या 13 धावांच्या बळावर आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने 4.1 षटकात 4 बाद 56 धावांसह सहज पुर्ण करत विजय मिळवला. 19 धावा करणारा बालाजी पवार सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत शुभम टाळेकरच्या अष्टपैलू कामगिरीसह प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने शिवनगर क्रिकेट क्लब संघाचा 16 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अमित तपकीरच्या 30, प्रमोद कंदच्या नाबाद 14 व शुभम टाळेकरच्या नाबाद 11 धावांच्या बळावर प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने 6 षटकात 2 बाद 65 धावा केल्या. 65 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वप्निल शिवले व शुभम टाळेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे शिवनगर क्रिकेट क्लब संघ 6 षटकात 3 बाद 49 धावांत गारद झाला. नाबाद 14 धावा व 10 धावांत 1 गडी बाद करणारा शुभम टाळेकर सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड)- 6 षटकात 4बाद 52 धावा(निलेश काळे नाबाद 22, प्रशांत चौधरी 2-16, सौरभ दोडके 1-17, निलकंठ पवार 1-4) पराभूत वि आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक)- 4.1 षटकात 4 बाद 56 धावा(बालाजी पवार 19, वौभव पांडूले 18, राजेंद्र पानेसर 13, नितिन पवार 2-15, अमित बावले 1-18, राजेंद्र येवले 1-22)सामनावीर- बालाजी पवार
आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब- 6 षटकात 2 बाद 65 धावा(अमित तपकीर 30, प्रमोद कंद नाबाद 14, शुभम टाळेकर नाबाद 11, तन्वीर शेख 2-3)वि.वि शिवनगर क्रिकेट क्लब- 6 षटकात 3 बाद 49 धावा(श्रीराम सोळे नाबाद 20, निलेश डोंबाळे 15, उमेश जाधव 14, स्वप्निल शिवले 2-8, शुभम टाळेकर 1-10) सामनावीर- शुभम टाळेकर
प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने 16 धावांनी सामना जिंकला.