मागच्या आयपीएलपर्यंत राजस्थान रॉयल्सचा सदस्य असलेला आर्यमन बिर्लाने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशकडून खेळणार्या 22 वर्षीय आर्यमनने शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर याची घोषणा केली. त्यानी एका निवेदनात म्हटले आहे की, “मी येथे पोहोचेपर्यंतचा माझा प्रवास कठोर परिश्रम, समर्पण आणि धैर्याने भरलेला आहे. खेळापासून जोडल्या गेलेल्या समस्यांना सामोरे जाणे थोडे कठीण होत आहे.”
देशातील प्रमुख उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन म्हणाला आहे की, ‘मी आतापर्यंत खेळायचा प्रयत्न केला पण आता मानसिक आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा झाला आहे.’ मध्यप्रदेशकडून कनिष्ठ प्रकारात खेळणारा आर्यमन 2017 मध्ये रणजी वरिष्ठ संघात सामील झाला. त्याने नऊ प्रथम श्रेणीचे सामने आणि चार अ दर्जाचे सामने खेळले.
सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्याने तीन शतकांसह 602 धावा केल्या. 2018 ते 2019 या दोन मोसमात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळता आले नाहीत.
तसेच त्याला आयपीएल 2020 लिलावापूर्वी राजस्थानने मुक्त केले. याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल, निक मेडिन्सन आणि विल पुकोव्स्की यांनीही मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.
आयपीएलच्या एकाही संघाने पसंती न दाखवलेल्या शाय होपने केला मोठा पराक्रम
वाचा- 👉https://t.co/b7hhGPLAx2👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvWI #Hope— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
मुंबई इंडियन्सचं टेन्शन मिटलं, तीन मुख्य शिलेदार आलेत फाॅर्मात
वाचा👉https://t.co/JIEbBD9Ml1👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvsWI #IPL2020 #MumbaiIndians— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019