इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हेडिंग्ले कसोटीत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज ऍशेस 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. अशात तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचे तो सोने करताना दिसत आहे. वुडने सामन्याच्या पहिल्याच दिवशी 150 किमी ताशी गतीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा त्याच्याच चेंडूवर बाद झाला.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना गुरुवारी (6 जुलै) हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू झाला. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडला पराभवा स्वीकारावा लागला होता. अशात तिसऱ्या कसोटीत विजय मिळवणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या कसोटीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचे बदल केले. यातील एक बदल म्हणजे मार्क वुड (Mark Wood) याला खेळवण्याचा.
हेडिंग्ले कसोटीत आपल्या चौथ्या षटकात मार्क वुडने उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) सामन्यातील 13व्या षटकात वैयक्तिक 13 धावांवर खेळत होता. पण षटकातील शेवटचा चेंडू त्याला चकवा देऊन थेट स्टंप्समध्ये घुसला आणि सलामीवीर क्लीन बोल्ड झाला. मार्क वुडने हा चेंडू ताशी 152 किमी गतीने टाकला होता. सामन्यातील वुडने टाकलेले हे चौथे शतक असून त्याआधी त्याने फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या. सामन्यातील पहिले 22 चेंडू वुडने निर्धाव टाकले होते. 23व्या छेंडूवर ख्वाजाने दोन धावा घेतल्या आणि 24व्या चेंडूवर तो बाद झाला. तत्पूर्वी सामन्यातील आपल्या दुसऱ्या षटकात वुडने तब्बल 155.3 किमी ताशी गतीने चेंडू टाकला होता.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1676913053240279043?s=20
या सामन्यातील इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा विचार केला, तर जेम्स अँडरसन, जोश टंग आणि ओली पोप या तिघांना विश्रांती दिली गेली आहे. त्यांची गाजा भरण्यासाठी मार्क वुड, ख्रिस वोक्स आणि मोईन अली यांना खेलवले गेले आहे. या निर्णायक सामन्यात इंग्लंड संघ जर पराभूत झाला, तर मायदेशातील ऍशेस मालिका त्यांना गमाववी लागेल. कारण पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून आधीच 0-2 अशी आघाडी घेतली आहे. हेडिंग्ले कसोटीत नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीला आला. पण त्यांचे दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या 42 असताना तंबूत परतले. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी अनुक्रमे 4 आणि 13 धावांची खेळी केली. (Mark Wood’s incisive bowling in the Headingley Test)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या ‘या’ खेळाडूला सूर्याकडून शुभेच्छा; म्हणाला, ‘मी तुझ्यासाठी…’
पीसीबी अध्यक्षपदाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, प्रत्येक गोष्टीसाठी घ्यावी लागणार पंतप्रधानांची परवानगी