पुणे: अशोका इलेव्हन आणि लिजेंड्स युनायटेड यांनी मंगळवारी येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागातील पीडीएफए फुटबॉल लीगस्पर्धेत सहज विजयांसह आपली आगेकूच कायम राखली.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या ड गटातील सामन्यात अशोका इलेव्हनने ब्लॅक हॉक्सचा 4-0 असा पराभव केला. अशोका इलेव्हनला सुरवातीलाच आयता गोल मिळाला. जयप्रकाशने बचावाच्या नादात आपल्याच संघावर गोल केला. त्यानंतर अभिषेक सिंग (20वे), स्टीफन नायर (30वे) आणि रविकिरण एम.एम (46वे) यांनी गोल करत संघाचा विजय साकार केला.
तृतिय श्रेणीमध्ये, आर्यन तांबे (18वा, 58वा) याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर सी गटातील सामन्यात लिजेंडस युनायटेडने इनव्हेडर्सचा २-० असा पराभव केला.
ब गटामध्ये, व्हिन्सेंट्स ओल्ड बॉईजने (व्हीओबीए) मोमीनपुरा एफसीवर 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. व्होबाकडून ब्रेंडन क्रॅस्टो (18वे) आणि प्रथमेश डेडगे (42वे) यांनी गोल केले.
निकाल –
एसप महाविद्यालय. तृतिय श्रेणी
गट ब : व्हिन्सेंट ओल्ड बॉईज असोसिएशन : 2 (ब्रेंडन क्रॅस्टो 18वा; प्रथमेश डेडगे 42वा) वि.वि. मोमिनपुरा एफसी : 0
गट सी : लिजेंड्स युनायटेड: 2 (आर्यन तांबे 18वा, 58वा) वि.वि. इनव्हेडर्स ०
गट सी : लौकिक एफए: 1 (वेदांत वाणी 22वे मिनिट) बरोबरी वि. पूना सोशल ‘ब’: 1 (साहिल शेख 54वे मिनिट)
गट डी : पूना सोशल एससी : ३ (यश घाग ३३वे, ५२वे; संजय थापा ४५वे मिनिट) वि.वि. भोर एफसी : ०
एसएसपीएमएस मैदान, द्वितीय श्रेणी
गट डी : अशोका इलेव्हन : 4 (जयप्रकाश पहिला – स्व गोल; अभिषेक सिंग 20वे; स्टीफन नायर 30वे, रविकिरण एमएम 46वे) वि.वि. ब्लॅक हॉक्स: 0
गट अ : एफ.सी. जोसेफ: ३ (नीलेश ओंकाराज ११वे; ऑलविन जोसेफ ४५वे; मंगल तुडू ५८वे) वि.वि. दिएगो ज्युनियर्स: १ (अनस्ता पालनकर १५वे मिनिट)
गट अ – व्हॅली हंटर्स: 1 (साजिद शेख 34वे) बरोबरी वि. एफसी बेकडिन्हो: 1 (जेम्स डिसोझा 28वे)
गट अ : डेक्कन इलेव्हन ‘क’: 2 (आदित्य परांजपे 23वे, मिहिर राठोड 47वे) वि.वि. युनायटेड पूना स्पोर्ट्स अकादमी (यूपीएसए): 1 (क्षितिज इंगवले 30वे)
गट ब : पीसीएच लायन्स (पुढे चाल) वि. एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत