भारतीय हॉकी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जकार्ता, इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी २०२२ स्पर्धेतील सुपर ४ सामन्यात भारतीय हॉकी संघाने विजयी सुरुवात केली. शनिवारी (दि. २८ मे) आशिया चषकात भारत आणि जपान हे दोन संघ आमने-सामने होते. दोन्ही संघ जेव्हा मागील वेळी आमने- सामने आले होते, तेव्हा सामन्यात जपान संघाने बाजी मारली होती. मात्र, याचा सूढ भारतीय संघाने या सामन्यात घेतला. (India Men’s Hockey Team beat Japan 2-1 in Hero Asia Cup 2022)
भारतीय हॉकी (Indian Hockey Team) संघाने जपान (Japan Hockey Team) संघाला २-१ ने मात दिली. भारताकडून मनजीत (Manjeet) याने आठव्या मिनिटाला गोल केला. यानंतर पवन राजभर (Pawan Rajbhar) याने ३५व्या मिनिटाला गोल केला. दुसरीकडे जपानकडून तकुमा निवा (Takuma Niwa) याने एकमेव गोल केला. हा गोल त्याने सामन्याच्या १८व्या मिनिटाला केला होता.
India defeated Japan by one goal in today's Hero Asia Cup 2022, which was held in Jakarta, Indonesia.
Comment "Bharat Mata Ki Jai"
IND 2-1 JPN#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #MatchDay #INDvsJPN @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SA pic.twitter.com/87SMwAuzaH
— Hockey India (@TheHockeyIndia) May 28, 2022
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर होते. मात्र, पुढे भारतीय संघाने बाजी मारली. सुपर ४मधील भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (दि. २९ मे) मलेशिया संघाविरुद्ध होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! अखेरच्या क्षणी भारताने पाकिस्तानविरुद्ध गमावली विजयाची संधी, आशिया कप सामन्यात बरोबरी
भारतीय हाॅकी क्षेत्राचे मोठे नुकसान, ‘या’ माजी कर्णधाराचे निधन
व्ही.के.सोनावणे स्मृती चषक हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अकादमी संघाला विजेतेपद