दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत श्रीलंका संघाने उपहारापर्यंत ४७ षटकांत ४ बाद ११९ धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ५९ षटकांत ६ विकेट्सची गरज असून ५व्या दिवसातील शेवटची दोन सत्र बाकी आहेत.
तत्पूर्वी ३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला दिवसातील ६व्या षटकातच जोरदार धक्का बसला जेव्हा बर्थडे बॉय रवींद्र जडेजाने भारताला पहिली विकेट मिळवून देताना मागील डावातील शतकवीर अँजेलो मॅथ्यूजला अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले.
अँजेलो मॅथ्यूजला याबरोबर जडेजाने कसोटीत ६व्यांदा बाद केले. मॅथ्यूज जेव्हा बाद झाला तेव्हा पंचांनी तो नो बॉल असल्याचे चेक केले नाही परंतु नंतर रिप्लेमध्ये तो नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते.