सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघाची दयनीय अवस्था केली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या २४४ धावांवर गारद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाची जबरदस्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मिळून एक-दोन नव्हे तब्बल ३ भारतीय खेळाडूंना धावबाद केले.
सर्वप्रथम हनुमा विहारी झाला धावबाद
भारताचा ‘कसोटी स्पेशलिस्ट’ हनुमा विहारी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने ३८ चेंडूंचा सामना करत कशाबशा ४ धावा काढल्या होत्या. अशात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन डावातील ६८वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विहारीने मिड ऑफला शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात जोश हेजलवुडने चेंडू पकडला आणि वेगाने यष्टीच्या दिशेने फेकला. चेंडू जाऊन सरळ यष्टीला लागला आणि विहारी धावबाद झाला.
Don't take on the Hoff! ⚡@hcltech | #AUSvIND pic.twitter.com/eXFpRPuKiJ
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे दोघांनी गमावली विकेट
त्यानंतर भारतीय संघाची वरची आणि मधली फळी अपयशी ठरल्यानंतर फिरकीपटू आर अश्विन अष्टपैलू रविंद्र जडेजासोबत संघाचा डाव पुढे नेत होता. अश्विनने १५ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १० धावादेखील काढल्या. मात्र जडेजाच्या चुकीमुळे त्याने आपली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरॉन ग्रीन डावातील ९३ वे षटक टाकण्यासाठी आला होता. जडेजाने त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शॉट मारला आणि अश्विनला एक धाव घेण्याचा इशारा केला.
तोपर्यंत पॅट कमिन्सने जडेजाचा चेंडू पकडला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. मार्नस लॅब्यूशाने तिथे सावध उभा होता. त्याने पटकन चेंडू पकडला आणि यष्टीला लावला. अशात अश्विनने क्रीजवरील रेषा पार तर केली; मात्र अवघ्या काही सेकंदानी त्याची धाव हुकली. त्यामुळे अश्विनला पव्हेलियनला परतावे लागले.
Run out! Cummins spots up Labuschagne and Ashwin's heading back!
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/XdTtL5bkjA
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
एवढेच नव्हे तर, जडेजामुळे अश्विनव्यतिरिक्त जसप्रीत बुमराहनेही विनाकारण आपली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क डावातील ९७ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसरा चेंडू जडेजाच्या पॅडवर लागणार त्यापुर्वी जडेजाने शॉर्ट लेगकडे चेंडू मारला आणि गडबडून धाव घेण्यासाठी पळला. जडेजा आणि बुमराहने एक धाव पुर्णही केली. त्यानंतर जडेजा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या उद्देशाने दुसरी धाव घेण्यासाठी धावला.
परंतु तेव्हापर्यंत लॅब्यूशानेने चेंडू पकडला आणि सरळ नॉन स्ट्राईकर बाजूच्या यष्टीवर मारला. त्यामुळे दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी नॉन स्ट्राईकर बाजूला धावत असलेला बुमराह शून्यावर धावबाद झाला.
UNREAL in the field! #AUSvIND pic.twitter.com/m5aIiqtlgC
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
It was a dynamite display in the field by Australia! Watch all 10 Indian wickets to fall here #AUSvIND pic.twitter.com/4I05u5eEt9
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
भारतीय संघ गमावणार तिसरा कसोटी सामना?
अशाप्रकारे एका डावात भारतीय संघाचे तब्बल तीन खेळाडू धावबाद झाला. महत्त्वाचे म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या एका डावात ३ भारतीयांनी धावबाद होण्याची ही सातवी वेळ होती. यापुर्वी १२ वर्षांआधी म्हणजे २००८ मध्ये मोहाली येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील एका डावात भारताचे ३ खेळाडू धावबाद झाले होते.
दुर्दैवाने भारतीय कसोटी संघावर यापुर्वी ६ वेळा ओढावलेल्या या नामुष्कीवेळी संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे सिडनी कसोटीत भारतीय संघावर पराभवाचे काळे सावट पसरले असल्याचे दिसत आहे. अशात भारतीय संघ या सामन्यातील दुसऱ्या डावात पुनरागमन करत सामना जिंकेल का नाही?, हे पाहणे रोमांचक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : तळातील फलंदाजी गडगडली; भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात
“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन
कमिन्सच्या सुरेख चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे बोल्ड, पाहा व्हिडिओ