भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. या संपूर्ण मालिकेला दुखापतींचा ग्रहण लागले असून, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे.
उमेशच्या अनुपस्थितीत भारतीय संघासमोर तिसरा प्रमुख वेगवान गोलंदाज कोण? हा प्रश्न पडला आहे. यासाठी प्रामुख्याने दोन नावे समोर येत आहेत, ती म्हणजे मुंबईकर शार्दुल ठाकूर व दिल्लीकर नवदीप सैनीची. संघ निवडीमध्ये सिडनीचे वातावरण व खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
तिसऱ्या वेगवान गोलंदाजांची निवड ही प्रामुख्याने सिडनी येथील वातावरणावरच अवलंबून असणार आहे. जर वातावरण ढगाळ असेल, आणि चेंडू स्विंग होण्याची शक्यता असेल, तर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. तसेच जर खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल तर अशावेळी सैनीच्या गतीचा वापर होण्यासाठी त्याला संधी दिली जाऊ शकते.
सैनी च्या गोलंदाजीत अतिरिक्त गती व बाऊंस आहे. तर शार्दुल हा स्विंग गोलंदाज आहे. अनेक दिग्गजांच्या मते शार्दुलचे पारडे जड आहे, कारण तो तळाला येऊन उत्तम फलंदाजी देखील करू शकतो. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे कोणत्या खेळाडूला संधी देतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया-भारत पडले मागे; न्यूझीलंड कसोटीचा नवा किंग
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी कोहली-पंड्यावर प्रोटोकॉल तोडल्याचा केलेला आरोप कितपत खरा, घ्या जाणून
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ