भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. सामन्यातील सुरुवातीचे तीनही दिवस उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. मात्र सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
7 स्पोर्ट्स या ऑस्ट्रेलियातील वाहिनीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार सामन्याच्या चौथ्या दिवशी 60 तर सामन्याच्या पाचव्या दिवशी तब्बल 80 टक्के पावसाची शक्यता आहे. पावसामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळातील शेवटचे सत्र देखील रद्द करण्यात आलेले होते.
असे असले तरी भारतासाठी चांगली गोष्ट अशी की पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला तर प्रतिष्ठेची बॉर्डर – गावसकर ट्रॉफी भारत मायदेशी आणण्यात यशस्वी होईल. कारण भारताने २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे सध्या ही ट्रॉफी भारताकडे असल्याने आणि सध्या सुरु असलेल्या मालिका १-१ ने बरोबरीत असल्याने जर चौथा सामना अनिर्णित राहिला तर ही ट्रॉफी भारतच राखेल.
J̶a̶n̶e̶ ̶B̶u̶n̶n̶ @blewy214 highlights why Australia were so keen to get back on the field late yesterday #AUSvIND pic.twitter.com/YpAJibpDxz
— 7Cricket (@7Cricket) January 17, 2021
दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतावर दडपण निर्माण केले आहे. भारताने पहिल्या सत्रातच चेतेश्वर पुजारा व कर्णधार अजिंक्य रहाणेच्या विकेट गमावल्या आहेत. भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राखेर 60 षटकांत 4 गडी गमावत 161 धावांपर्यंत मजल मारली होती. मयंक अग्रवाल 38 तर रिषभ पंत 4 धावांवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा
अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू
नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…