सध्या पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र पाकिस्तान हरल्यामुळे या सामन्यात बाबर आझम (Babar Azam) चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, त्याने या सामन्यात मात्र 37 धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले. दरम्यान बाबर आझम (Babar Azam) 37 धावांवर ॲडम झाम्पाच्या (Adam Zampa) गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नवीन कर्णधार मोहम्मद रिझवानने (Mohammed Rizwan) 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने (Shahid Afridi) 24 धावा, तर नसीम शाहने (Naseem Shah) 40 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि फिरकीपटू ॲडम झाम्पा (Adam Zampa) यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
204 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी 28 धावांवर विकेट गमावल्या. त्यानंतर, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) (44) आणि जोश इंग्लिश (Josh Englis) यांनी संघासाठी 85 धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. त्यामुळे सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकले होते.
त्यानंतर या सामन्यात पाकिस्तानने दमदार पुनरागमन केले होते, मात्र कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) त्यांच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरला. कमिन्सने 32 धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रलियाला 2 गडी राखून विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय जोश इंग्लिशने 49 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) 2 आणि नसीम शाहने (Naseem Shah) 1 विकेट घेतली. पण पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यश आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव? ही नावे शर्यतीत
ब्रायन लाराच्या आधी ‘या’ फलंदाजाने ठोकल्या असत्या कसोटीत 400 धावा
उचलली जीभ, लावली टाळ्याला!; म्हणे, “पाकिस्तान भारताला कसोटी मालिकेत पराभूत करू शकतो”