मुंबई। उद्यापासून(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ 2-1 अशा फरकाने विजय मिळवेल अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने केली आहे.
पाँटिंगला ट्विटरवर अनेक चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले, या प्रश्नांना पाँटिंगने उत्तरे दिली आहेत. यातील एका चाहत्याने पाँटिंगला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या वनडे मालिकेबद्दल अंदाज वर्तवण्यास सांगितला होता.
यावेळी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया मालिका जिंकेल हा अंदाज वर्तवताना ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या चांगल्या फॉर्मबद्दल भाष्य केले आहे.
तसेच त्याने असेही म्हटले आहे की मागच्यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला वनडे मालिकेत 3-2 ने पराभूत केले होते, त्यामुळे यावेळी भारत विजय मिळवण्यास उत्सुक असेल.
पाँटिंगने चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ट्विट केले आहे की “विश्वचषकानंतर आणि या उन्हाळ्यात खेळलेल्या शानदार कसोटी क्रिकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.”
“पण भारतीय संघही मागील वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता विजय मिळवण्यास उत्सुक असेल. माझ्या अंदाजानुसार ही मालिका 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलिया जिंकेल.”
Australia will be full of confidence after an excellent World Cup and a great summer of Test cricket but India will be keen to redeem themselves from the last ODI series loss against Australia. Prediction: 2-1 Australia https://t.co/r5fIiLNs6Y
— Ricky Ponting AO (@RickyPonting) January 12, 2020
उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारा पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल.
निवृत्तीतून माघार घेतलेला हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर करतोय पुनरागमन https://t.co/t9vFmdHNjB#म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
केकेआरला मोठा धक्का, हा खेळाडू आयपीएल २०२० खेळण्यासाठी अपात्र
वाचा👉https://t.co/W7Z8HOIfWr👈#म #मराठी #Cricket #IPL2020 #KKR— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020