क्रिकेटमध्ये अनेकदा अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत. बऱ्याचदा क्षेत्रकक्षक अप्रतिम झेल घेत तर कधी फलंदाज चांगला फटका मारत प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करत असतो. अशीच एक अविश्वसनीय घटना गुरुवारी ऑस्ट्रेलिया गव्हर्नल जनरल एकादश विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडलेल्या वनडे सामन्यात घडली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज हिदर ग्रॅहमने एक विचित्र झेल घेतला आहे. ती जेव्हा 45 षटकात गोलंदाजी करत होती तेव्हा न्यूझीलंडकडून फलंदाजी करत असलेल्या केटी परकिंन्सने सरळ फटका मारला.
हा चेंडू नॉन स्ट्रायकर एन्डला असणाऱ्या केटी मार्टीनच्या बॅटला लागुन उडाला आणि गोलंदाजी करणाऱ्या ग्रॅहमने तो झेल पकडला. याचवेळी मार्टीनची बॅटही हवेत उडून खाली पडली. त्यामुळे ग्रॅहमसह ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूही आश्चर्यचकीत झाले.
तसेच पंचही बाद द्यायचे की नाही याबद्दल गोंधळात पडले. यामुळे त्यांनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. ज्यावर परकिंन्सला बाद देण्यात आले.
या झेलचा व्हिडिओ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीमच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘किटी मार्टीनच्या मदतीमुळे हिदर ग्रॅहमने तूम्ही पाहिलेल्या विचित्र झेलांपैकी एक झेल पकडला आहे.’
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 323 धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव या आव्हानाचा पाठलाग करताना 157 धावांवरच संपूष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडने 166 धावांनी हा सामना जिंकला.
Oh WOW! Katey Martin helps Heather Graham pick up one of the most bizarre dismissals you'll ever see in the Governor General's XI match! 😱 pic.twitter.com/fSV3GJkjyA
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 28, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट कोहलीला द वाॅल राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी
–काय सांगता ! हिटमॅन रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला
–उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया
–पहिल्या वनडेत धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडियाला मोठा धक्का