मेलबर्न । आज रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच लढतीनंतर ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रॉजर फेडररने टोमास बर्डिचवर तर ह्येन चुंगने तेँनीस सॅन्डग्रेनवर सरळ सेटमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
तर महिलांच्या एकेरीमध्ये मॅडिसन कीला २१व्या मानांकित अँजेलिक कर्बर विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित सिमोना हॅलेपने कॅरोलिन प्लिस्कोवावर विजय मिळवला.
पुरुष एकेरी
सामना १: मारिन चिलीच विरुद्ध काईल एडमंड
सामना २: रॉजर फेडरर विरुद्ध ह्येन चुंग
महिला एकेरी
सामना १: सिमोना हॅलेप विरुद्ध अँजेलिक कर्बर
सामना २: एलिस मार्टनेस विरुद्ध कॅरोलिन वोझनीयाकी