भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्याची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. यापैकी पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होत. त्यानंतर विराट कोहली रजेवर गेला. त्यामुळे भारतीय संघाच्या नेतृत्वाची माळ अजिंक्य रहाणेच्या गळ्यांत पडली. अजिंक्यने नेतृत्व स्विकारताना मेलबर्न येथे दुसर्या कसोटीत भारताला दमदार पुनरागमन करुन देत विजय मिळवला. या विजयाने अनेक विक्रम प्रस्तापित केले होते. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे अनोखा विक्रम करण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर मोठा विक्रम करण्याची संधी अजिंक्य रहाणेच्या संघाला आहे. या मैदानावर भारतीय संघाला मागील 43 वर्षापासून दुसर्या विजयाची अपेक्षा आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या मालिकेत बरोबरीत आहेत. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्याचबरोबर अजून दोन सामने शिल्लक आहेत.
सिडनीत 43 वर्षापूर्वी पहिला विजय
सिडनी मैदानावर भारतीय संघाची कामगिरी काही खास राहिलेली नाही. मात्र तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मात देण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आत्तापर्यंत झालेल्या 12 सामन्यांपैकी भारतीय संघाला एकमात्र विजय मिळवता आला होता.
भारतीय संघाला 1978 साली बिशनसिंह बेदी यांच्या नेतृत्वाखाली सिडनीच्या मैदानात पहिल्यांदा विजय मिळवता आला होता. बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला एक डाव आणि 2 धावांनी पराभूत केले होते. हा डावाच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेला सर्वात मोठा विजय होता. पण 43 वर्षापूर्वी मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाला या मैदानावर दुसरा विजय मिळविता आलेला नाही.
खास योगायोग –
महत्वाचे म्हणजे भारतीय संघाने 1978 साली जेव्हा सिडनीत विजय मिळवला होता, तेव्हा त्या कसोटीची सुरुवात सुद्धा 7 जानेवारीला झाली होती. त्याचबरोबर आता खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना ही 7 जानेवारी पासून सुरू होणार आहे. सिडनीत कसोटी सामन्याची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 1882 साली झालेल्या सामन्याने झाली होती. भारताने सिडनीत आपला पहिला कसोटी सामना 1947 साली देश स्वातंत्र्यानंतर खेळला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑसी फलंदाज टीम इंडियविरुद्ध जास्त धावा का करू शकले नाहीत? लँगरनी सांगितले कारण
सूर गवसण्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरला करावे लागेल ‘हे’ काम, कोच लँगरचा सल्ला
“या क्षणाची वाट पाहण्यात माझे केस पांढरे झाले”, सचिनच्या शंभराव्या शतकाविषयी रैनाचा खुलासा