मुंबई। गुरुवारी (७ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात लखनऊने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ८० धावांची खेळी सामनावीर पुरस्कार जिंकला. पण याबरोबरच या सामन्यात लखनऊचा युवा फलंदाज आयुष बदोनीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या सामन्यात लखनऊसाठी विजयी षटकार देखील ठोकला. दरम्यान, त्याच्या या खेळीमुळे सर्वांना एमएस धोनी आणि विराट कोहलीचीही आठवण झाली.
या सामन्यात दिल्लीने लखनऊसमोर १५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला अखेरच्या दोन षटकात १९ धावांची गरज होती. पण १९ व्या षटकात १४ धावा आल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात लखनऊला ५ धावांचीच गरज होती. यावेळी २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दीपक हुडा बाद झाला. त्यामुळे सामन्यात रंगत आली होती.
पण त्यानंतर मैदानात आलेल्या बदोनीने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव काढली नाही, मात्र तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला आणि चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याच्या विजयी षटकारामुळे अनेक चाहत्यांना धोनीची आठवण झाली.
@ChloeAmandaB @imVkohli
Ayush Badoni celebrating victory in Virat Kohli style#ViratKohli the influencer of youngster.
👑👏#DCvsLSG #IPL2022 pic.twitter.com/0isVEsdFo9— Sohon O7 (@O7Sohon) April 8, 2022
https://twitter.com/hemant18326/status/1512272488381657091
इतकेच नाही तर, लखनऊच्या विजयानंतर बदोनीने केलेल्या सेलिब्रेशनमुळे त्यानी सर्वांना विराट कोहलीहीची आठवण करून दिली. त्याने सामना जिंकल्यानंतर स्वत:लाच शाबासकी देण्यासारखी कृती केली. तसेच त्याने नंतरही जल्लोष केला. त्याने ज्याप्रकारे सेलिब्रेश केले, अगदी तसेच सेलिब्रेशन विराटने यापूर्वी भारताकडून खेळताना केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटच्या आणि बदोनी यांच्या सेलिब्रेशनची तुलना होणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बदोनीने लखनऊकडून खेळताना ३ चेंडूत १० धावांची नाबाद खेळी केली.
बदोनीने यापूर्वीही निभावली फिनिशरची भूमिका
२२ वर्षीय बदोनी देशांतर्गत क्रिकेट दिल्लीकडून खेळतो. तसेच त्याने याचवर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आयपीएल पदार्णातच लखनऊकडून खेळताना सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सकडून ४१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. तसेच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद १९ धावांची खेळी केली, तर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १२ चेंडूत १९ धावांची खेळी केली. त्याचे लखनऊचा कर्णधार केएल राहुलने ‘भारताचा बेबी एबी’ असे म्हणत कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी गांगुली म्हणालेला सचिनला बाद केलस, आता हे लोक तुला मारतील’, शोएब अख्तरचा खुलासा
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक