भारताचे माजी कर्णधार आणि जगातील एक स्टायलिश खेळाडू राहिलेल्या मोहम्मद अझरुद्दीन यांनी ३६ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून आपल्या खेळाने दहशत निर्माण केली होती. त्यांनी केवळ आपल्या पदार्पणातच्या कसोटीच नव्हे तर त्यापुढील आणखी दोन कसोटीत देखील शतके ठोकली होती. अझरुद्दीन जे आपल्या उत्कृष्ट स्ट्रोक प्लेसाठी ओळखला जात. ते मनगटी फटके मारण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली.
आपल्या अप्रतिम मनगटी फटक्यांच्या खेळामुळे त्यांना ‘वंडर बॉय’ म्हणून देखील ओळखले जात. अझरुद्दीन यांची बॅट पाकिस्तानविरुद्ध देखील चांगली तळपत. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांना कट्टर प्रतिस्पर्धी मानून मैदानात उतरत असतात. या दोन्ही देशांदरम्यान खेळले गेलेले सामने प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कट्टर प्रतिस्पर्धा असल्याचे सामन्यादरम्यान मैदानात अनेक तणावपूर्ण घटना घडत असतात. मात्र, यादरम्यान काही गमतीदार घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना ९० च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात घडली होती. जेव्हा भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी युवा शाहिद आफ्रिदीला गोलंदाजी करताना मजेशीर सल्ला दिला होता.
अत्यंत प्रतिभाशाली म्हणून चर्चा झालेला शाहिद आफ्रिदी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात भारताविरुद्ध खेळत होता. फिरकीपटू विरुद्ध खेळण्यात वाकबगार असलेल्या अझरुद्दीन यांना त्याने चांगले जखडून ठेवलेले. आफ्रिदी दोन चेंडूंमध्ये अजिबात वेळ न घेता पटापट चेंडू फेकत होता. आफ्रिदी टाकत असलेल्या ३६ व्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना केल्यानंतर अझरुद्दीन यांनी आफ्रिदीला चेंडू टाकण्यादरम्यान वेळ घेण्यास सांगितले. यासंबंधीचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अझरुद्दीन आफ्रिदीला असे म्हणताना दिसत आहेत की, ‘थोडा वेळ घेऊन चेंडू टाक बडे भैया’ अझरुद्दीन यांच्या या सल्ल्यानंतर आफ्रिदी हसताना दिसला.
मोहम्मद अझरुद्दीन यांची कारकिर्द
अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३ च्या सरासरीने ६२१५ धावा त्यांनी केल्या. ज्यात २२ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वाधिक धावसंख्या १९९ अशी आहे. तसेच वनडेत ३३४ सामने खेळले असून ७ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ९३७८ धावा केल्या आहेत. तसेच क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले होते.
अझरुद्दीन यांनी १९८७, १९९२, १९९६ आणि १९९६ या ४ वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिधिनित्व केले. विशेष म्हणजे यातील १९९२, १९९६ आणि १९९९ या तीन वनडे विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले. तीन वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारे ते एकमेव कर्णधार आहेत.