पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मधील वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार पीसीबीकडून जाहीर करण्यात आले असून सन 2020 या वर्षात विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह बर्याच खेळाडूंना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
मर्यादित षटकांतील सर्वोत्तम खेळाडू
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याची शुक्रवारी(1 जानेवारी) त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पीसीबने 2020 या वर्षातील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या 26 वर्षीय खेळाडूला मर्यादित षटकांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले आहे. बाबर आझमने 2020 या वर्षात वनडेत 110.5 आणि टी-20 मध्ये 55.2 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये यंदा चार सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने 67.6 च्या सरासरीने 338 धावा केल्या आहेत.
कसोटी मधील सर्वोत्तम खेळाडू
त्याचबरोबर पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानची पीसीबीने 2020 या वर्षातील कसोटीमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्याने 5 कसोटी सामन्यात 4 अर्धशतकाच्या मदतीने 302 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने यष्टीरक्षक करताना 12 खेळाडू बाद केले आहेत. त्याचबरोबर बाबर आझमला दुखापत झाल्याने तो सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
सर्वश्रेष्ठ वैयक्तिक प्रदर्शन करणारा खेळाडू
तसेच पाकिस्तान संघाचा फलंदाज फवाद आलम याने माऊंट मोन्गानुई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 102 धावांची खेळी केली होती. यासाठी त्याला पीसीबीने 2020 मधील सर्वश्रेष्ठ वैयक्तिक प्रदर्शन करणारा खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्याने 11 वर्षानंतर कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकवले होते. त्याला 2009 नंतर थेट 2020 साली पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
सर्वश्रेष्ठ उदयोन्मुख खेळाडू
नसीम शाह या 17 वर्षीय खेळाडूची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मधील सर्वश्रेष्ठ उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड केली आहे. नसीमने 8 कसोटी सामन्यात 20 गडी बाद केले आहेत. ज्यामधे बांगलादेश विरुद्ध घेतलेल्या हॅटट्रिकचा सुद्धा समावेश आहे. ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
याला म्हणतात प्रतिभा! केवळ १२ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हॅट्रिक घेणारा क्रिकेटर
…म्हणून आयपीएल २०२० मधून घेतली माघार, सुरेश रैनाचा मोठा खुलासा