पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत लॉ कॉलेज लायन्स, डेक्कन ड, डेक्कन ब या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात लॉ कॉलेज लायन्स संघाने सोलारिस अ संघाचा 24-7 असा एकतर्फी पराभव केला. श्रीकृष्णा पानसे, केतन जाठर, शिवाजी यादव, अभिजित मराठे, तारक पारीख, आदेश तेलंग, जयभाई संतोष यांनी सुरेख कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.दुसऱ्या सामन्यात अमोल बापट, धनंजय सुमंत, अमलेश जाधवे, बाबू जाधवे, अतुल रुणवाल, इंद्रनील दाते, कौस्तुभ शहा, मनोज देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ब संघाने सोलारिस ब संघाचा 24-9 असा पराभव करून सलग दुसऱ्या विजय नोंदविला. डेक्कन ड संघाने हिलसाइड जिमखाना संघाचा 24-5असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. अन्य लढतीत लॉ चार्जर्स संघाने फ्युचर प्रो संघावर 18-14असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ओडीएमटी अ संघाने एमडब्लूटीए ब संघाला 19-9असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
लॉ चार्जर्स वि.वि.फ्युचर प्रो 18-14(100अधिक गट: नितीन खरे/संदीप माहेश्वरी वि.वि.श्रीराम वैद्य/बिंदू लोद्या 6-1; खुला गट: राहुल मंत्रा/विक्रम गुणे पराभूत वि.मंदार ग्यान/शुभक्त विश्वास 3-6; 90अधिक गट: मिलिंद राऊत/नितीन गवई पराभूत वि.ब्रुनो आर/पराग छेड्डा 3-6; खुला गट: श्रीनिवास रामदुर्ग/नितीन खैरे वि.वि.प्रशांत नगर/रोहन नाईक 6-1);
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.सोलारिस अ 24 -7(100अधिक गट: श्रीकृष्णा पानसे/केतन जाठर वि.वि.मनोज पालवे/संदीप आगते 6-2; खुला गट: शिवाजी यादव/अभिजित मराठे वि.वि.सौरभ कारखानीस/महेंद्र गोडबोले 6-0; 90अधिक गट: तारक पारीख/आदेश तेलंग वि.वि.बापू पायगुडे/राजू पिंपळे 6-0; खुला गट: केतन जाठर/जयभाई संतोष वि.वि.संतोष दळवी/संदीप आगते 6-5(7-5);
ओडीएमटी अ वि.वि.एमडब्लूटीए ब 19-9(100अधिक गट: उद्य गुप्ते/संतोष कुराडे वि.वि.अनिल सौंदतीकर/प्रमोद पाटील 6-0; खुला गट: कोनार कुमार/निलेश गायकवाड पराभूत वि.वि.मंदार मेहेंदळे/स्वेतल शहा 1-6; 90अधिक गट: एस मांडवकर/ नितीन सिंघवी वि.वि.प्रमोद उमजरे/निशांत भागिया 6-2; अधिक गट: बिनेश राजन/संतोष कुराडे वि.वि.मिलिंद घैसास/प्रफुल आशर 6-1;
डेक्कन ब वि.वि.सोलारिस ब 24-9(100अधिक गट: अमोल बापट/धनंजय सुमंत वि.वि.वसंत साठे/अनिल गायकवाड 6-5(7-5); खुला गट: अमलेश जाधवे/बाबू जाधवे वि.वि.शिव जावडेकर/अश्विन हळदणकर 6-1; 90अधिक गट: अतुल रुणवाल/इंद्रनील दाते वि.वि.प्रसाद सिरीमनी/नितीन बर्वे 6-1; खुला गट: कौस्तुभ शहा/मनोज देशपांडे वि.वि.अनिल गायकवाड/आशिष कुबेर 6-2);
डेक्कन ड वि.वि.हिलसाइड जिमखाना 24-5(100अधिक गट: राजीव पागे/आदित्य खटोड वि.वि.किरण दोशी/नंदू देवी 6-1; खुला गट: विभाश वैद्य/जितेंद्र जोशी वि.वि.डॉ. प्रविण/केवल सेठीया 6-2; 90अधिक गट: संजय कामत/अजय जाधव वि.वि.मधू मुंदडा/सुनील झाल्टे 6-0; खुला गट: आदित्य खटोड/केदार पाठक वि.वि.जितू मेहता/निखिल कोठारी 6-2)