भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचा निकाल यजमान बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेश संघाने हा सामना 4 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत व्हाईट वॉश घेतला नाही. भारताला जरी या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला, तरी मालिका मात्र भारताच्या नावावर झाली. भारताची दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना हिच्यासाठी हा सामना खास ठरला.
महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची गणना भारतीय दिग्गजांमध्ये केली जाते. स्मृतीने गुरुवारी (13 जुलै) बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच यशाचा मोठा टप्पा पार केला. तिच्या नावावर आता 200 आंतरराष्ट्रीय सामन्यांची नोंद झाली आहे. स्मृतीच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा सामना असला, तरी या सामन्यात तिला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. तिने 2 चेंडूत 1 धाव केली आणि सुलदाना खातूनच्या चेंडूवर फाहिमा खातून हिच्या हातात विकेट दिली.
स्मृती मंधानाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4 कसोटी, 77 वनडे आणि 119 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 325 धावांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिने 3073 धावा केल्या आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती 2854 धावा करू शकली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याचा –
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्या. पहिल्या दोन टी-20 सामन्यांप्रमाणे या सामन्यातही मिरपूरची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. परिणामी भारतीय संघ 20 षटकात 9 बाद 102 धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरात बांगालदेशने 18.2 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 103 धावा केल्या. (BAN W vs IND W t20i Smriti Mandhana Completes 200 International Matches)
महत्वाच्या बातम्या –
आशियाई ऍथलेटिक्स: अभिषेकने उघडले भारताच्या पदकांचे खाते! बँकॉकमध्ये फडकला तिरंगा
कृतज्ञ रायडू! ज्या शाळेने घडवले त्या शाळेसाठी केली ही मदत, नक्की वाचा