कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
त्याचबरोबर भारताकडून जयदेव उनाडकटने ३८ धावा देत ३ विकेट्स घेऊन बांगलादेशला १३९ धावात रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.
आजपर्यंत भारत आणि बांगलादेशमध्ये ६ टी२० सामने झाले आहेत. या सहाही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
याबरोबर बांगलादेश एक नकोशा अशा विक्रमाच्या जवळ पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक पराभव पाहिलेल्या संघांच्या यादीत हा संघ न्यूझीलॅंड आणि श्रीलंका संघाबरोबर अव्वल स्थानी आला आहे.
बांगलादेशने ७२ सामन्यात २१ विजय आणि ४९ पराभव पाहिले आहेत २ सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही.
न्यूझीलॅंड संघाला १११ सामन्यात ४९ पराभव आणि ५४ विजय तर श्रीलंका संघाला १०५ सामन्यात ४९ पराभव आणि ५४ विजय मिळाले आहेत.
विशेष म्हणजे उद्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना असुन जो संघ पराभूत होईल त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० पराभव लागणार आहेत.