आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये बांगलादेश संघाने मोठी मजल मारली आहे. बुधवारी (दि. 04 ऑक्टोबर) पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेश विरुद्ध मलेशिया आमने-सामने होते. या सामन्यात बांगलादेशने 2 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे त्यांना स्पर्धेत थेट उपांत्य सामन्याचे तिकीट मिळाले. अशात आता स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) खेळला जाईल.
बांगलादेशने रोखला मलेशियाचा विजयरथ
चीनच्या हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेश संघाने मलेशियाचा विजयरथ रोखला. मलेशियाने सिंगापूर आणि थायलंड संघांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. यावेळी बांगलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 116 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मलेशिया संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 114 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना हा सामना 2 धावांनी गमवावा लागला. यावेळी मलेशिया खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते.
Malaysian players in tears….!!!
They lost to Bangladesh by just 2 runs in the Quarter-final but what a fight back by Malaysia, incredible from this nation in the knock-out.
India will face Bangladesh in the Semis of cricket in Asian Games. pic.twitter.com/plyaKSflEt
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2023
मलेशियाकडून एकाचे अर्धशतक
बांगलादेशच्या 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विरनदीप सिंग याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त सय्यद अजीजने 20, तर विजय उन्नी आणि ऐनूल हाफिज यांनी प्रत्येकी 14 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज 5 धावांचाही आकडा पार करू शकला नाही. 3 फलंदाज शून्यावर बाद झाले, तर 3 फलंदाज 1 धाव करू शकले, ज्यातील दोघे नाबाद होते.
What a match and such a heartbreaking moment for Malaysia Cricket. Their biggest match ever and they almost beat Bangladesh.
In the end, experience of a higher ranked cricketing nation took over but clear signs that Associate cricket is better than ever! #AsianGames #Cricket pic.twitter.com/QlSrbUCaOm
— Karan Athrey (@NuttyAtty) October 4, 2023
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना रिपोन मंडल आणि अफीफ होसेन यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, रकिबुल हसन आणि रिशाद होसेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून कर्णधार सैफ हसन याने 52 चेंडूत नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त अफीफ होसेन 23, शहादत होसेन 21 आणि जेकर अली नाबाद 14 धावा करू शकला. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले, तर झाकिर हसन 1 धावेवर बाद झाला.
यावेळी मलेशियाकडून गोलंदाजी करताना पनवदीप सिंगने 2, तर विजय उन्नी आणि अन्वर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (bangladesh team beats malaysia in asian games 2023 and qualified for semifinal to play with india)
हेही वाचा-
…आणि भारत 28 वर्षांनंतर जगज्जेता बनला, कोट्यवधी मने जिंकणारा धोनीचा सिक्स अन् शास्त्रींची कॉमेंट्री अजरामर
गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग