बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अगामी काळात टी२० आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मागच्या पाच वर्षांपासून पाकिस्तान संघाने एकदाही बांगलादेश दौरा केला नव्हता, त्यानंतर आता या मालिकांचे आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आले आहे.
आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरला सुरू होणार असून विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विश्वचषकानंतर दोन्ही संघामध्ये टी२० आणि कसोटी मालिकेचे आयोजन केले जाईल. पीसीबीने मंगळवारी (१४ सप्टेंबर) या दौऱ्याची माहिती दिली आहे. पीसीबीने दिलेल्या माहितीप्रमाणे पाकिस्तानच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात टी२० मालिकेने होईल. ही टी २० मालिका ढाका मधील शेर-ए-बांगला या स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही देशातील टी२० मालिकेतील पहिला टी२० सामना १९ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २० आणि २२ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
टी२० मालिकेनंतर दोन्ही संघ चट्टोग्रामला जातील आणि तेथे २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ ढाकामध्ये पुन्हा येतील आणि दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून सुरू होईल.
दोन्ही संघामध्ये मे २०१५ नंतर पहिल्यांदा कसोटी सामन्याचे आयोजन केले गेले आहे. पाकिस्तानने यापूर्वी बांगलादेशसोबत खेळलेल्या कसोटी मालिकेत शेवटच्या कसोटी सामन्यात ३२८ धावांनी विजय मिळवला होता आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. बांग्लादेश संघाने अजिंक्यपद स्पर्धेत त्यांच्या अभियानाला अजून सुरुवात केलेली नाही ते पाकिस्तानसोबत होणाऱ्या कसोटी मालिकेसह अजिंक्यपद स्पर्धेत त्यांच्या अभियानाला सुरुवात करतील.
पाकिस्तान संघाचे बांगलादेशविरुद्ध आतापर्यंतचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्यांनी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांपैकी १० सामने जिंकले आहेत तसेच १२ टी२० सामन्यांपैकी १० सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सेंट लूसिया किंग्जची सीपीएलच्या अंतिम सामन्यात धडक, सेमीफायनलमध्ये शाहरुख खानची टीम पराभूत
दिवाळीआधी देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! बीसीसीआय करणार घसघशीत वेतनवाढ
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! मैदानात पुन्हा दिसणार प्रेक्षक, युएई सरकारने दिली परवानगी