बांगलादेश आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात मेहंदी हसनच्या भेदक गोलंदाजी समोर वेस्ट इंडिजची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
या सामन्यात विजय मिळवत बांगलादेशने वनडे विश्वचषकाच्या सुपरलीग मध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ 60 गुणांसह पहिल्या क्रमांकावर, तर 30 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश 20 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, तेवढ्याच गुणांसह पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा रन रेट पाकिस्तानपेक्षा उत्तम असल्याने त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.
Bangladesh are now on the third spot of the ICC Men's @cricketworldcup Super League standings after two wins in two matches.
Who will finish at the top?
Full table ➡️ https://t.co/rdVhmmVP6N pic.twitter.com/3efcl2lxbr
— ICC (@ICC) January 23, 2021
ढाकाच्या शेर-ए-बांगला स्टेडियम मध्ये पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टइंडीजचा पहिला डाव मेहंदी हसनच्या गोलंदाजीसमोर केवळ 148 धावांवर आटोपला. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून कर्णधार तमिम इक्बालने शानदार अर्धशतक झळकावत तब्बल 100 चेंडू राखून बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला.
आपल्या शानदार गोलंदाजीसाठी मेहंदी हसनला सामनावीराचा पुरस्कार घोषित करण्यात आला. हसनने 9.4 षटकात केवळ 25 धावा देत 4 फलंदाजांना बाद केले. दोन्ही संघांमधील मालिकेचा शेवटचा सामना येत्या 25 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
दरम्यान वेस्टइंडीजच्या जवळ जवळ सर्वच प्रमुख खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेतलेली होती. त्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेत युवा खेळाडूंना संधी दिली . मात्र युवा खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे वेस्टइंडीजला पहिल्या दोन्ही सामन्यात सपशेल पराभव पत्करावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्याने झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ
एक पाय काम करत नसतानाही देशासाठी तो दिड सत्र मैदानात लढत होता
तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया