---Advertisement---

दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने जिंकला टॉस, भारताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

KL Rahul & Shakib Al Hasan BANvIND 2nd Test
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून यजमान संघाने त्यामध्ये बाजी मारली आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे या सामन्यात भारत केएल राहुल (KL Rahul) याच्याच नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच बांगलादेशच्या संघात दोन तर भारताच्या संघात एक बदल झाला आहे.

भारताच्या मागील सामन्याच्या अंतिम अकरामधून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला वगळले असून त्याच्याजागी संघात जयदेव उनाडकट आला आहे. कुलदीपने मागील सामन्यात विजयी भुमिका पार पाडली होती. बांगलादेशमध्ये मोमिनुल हक आणि तस्किन अहमद यांना अंतिम अकरामध्ये जागा दिली आहे. यामुळे यासीर अली आणि इबादत हुसेन बाकावर बसले आहेत.

“कुलदीपला बाहेर बसवणे हा कठीण निर्णय होता. त्याच्या अनुपस्थितीत अश्विन आणि अक्षर यांच्याकडून फिरकीमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळेल. उनाडकटला उत्तम संधी आहे,”असे राहुलने नाणेफेकीवेळी म्हटले. कुलदीपने मागील सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताच्या पहिल्या डावात 40 धावांची खेळीही केली होती. यामुळे तो त्या सामन्याच्या सामनावीर ठरला होता. हा सामना भारताने 188 धावांनी जिंकला होता. त्यामुळे कुलदीपला बाकावर बसवणे हा भारताचा निर्णय किती परिणामी ठरेल हे, पहिल्या सत्रात दिसेलच.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-

भारत- केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

बांगलादेश- नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: तब्बल 24 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज
इतर संघांनीही पाकिस्तान दौरा केला पाहिजे! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---