विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी (८ ऑगस्ट) समाप्त झाला. भारतीय संघाला विजयाची संधी असताना अखेरच्या दिवशी पावसामुळे एकही षटकांचा खेळ झाला नाही व सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतीय कर्णधार विराट कोहली याला गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर, आता इंग्लंडच्या चाहत्यांचा गट असलेल्या बार्मी आर्मीने एक वादग्रस्त छायाचित्र पोस्ट केल्यानंतर चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे.
बार्मी आर्मीने केला खोडसाळपणा
नॉटिंघम येथील पहिल्या सामन्यात भारताचा करताय विराट कोहली याला इंग्लंडचा ३९ वर्षी अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्या चेंडूवर बाद केले. २०१४ दौऱ्यावेळी अँडरसनने कोहलीला चांगलेच त्रस्त केलेले. मात्र, विराटने २०१८ दौर्यात त्याच्याविरोधात एकदाही बाद न होता चूक सुधारली. परंतु, चालू दौऱ्याच्या पहिल्याच चेंडूवर अँडरसनने कोहलीला बाद करून आघाडी घेतली आहे.
कोहली आणि अँडरसन यांच्यातील संघर्षाचा इतिहास पाहता इंग्लंड संघाच्या समर्थकांचा गट बार्मी आर्मीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक छायाचित्र शेअर केले. ज्यामध्ये अँडरसन वयोवृद्ध दाखवला आहे.
या छायाचित्राला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले, ‘हे वर्ष २०५० असून ६८ वर्षाच्या जेम्स अँडरसनने ज्युनियर विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद करून १५०० बळी पूर्ण केले.’
The year is 2050 and a 68 year-old Jimmy Anderson has taken his 1,500th Test Wicket snicking off Virat Kohli Jr first ball. pic.twitter.com/JwKQhataCY
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) August 9, 2021
ह्या छायाचित्रावर भारतीय चाहत्यांनी बार्मी आर्मीला चांगलेच ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी उर्वरित मालिकेत आणखी भरपूर काही पाहायला मिळेल अशी उत्तरे दिली.
https://twitter.com/18_vanshika/status/1424673970498850816
Match cancelled due to rain 🙂
— Yashvi (@BreatheKohli) August 9, 2021
Virat kohli has only 1 daughter. @TheBarmyArmy I think you are trying to say that Jimmy may play in women's team at that age ???
Hey , @jimmy9 did you planned for any surgery to play in women's team ???— Dr. VK (@fanoffortywinks) August 9, 2021
This year is 2050 and a 18 year old pant jr has hit 3 consecutive sixes to 61 year old Jimmi Clouderson on reverse sweep…India is 4-0 in this tour but rain might save Eng from from cleen sweep in 6 consecutive tour
— Muhbola Boyfriend 🦹 (@funnyDrugDler) August 9, 2021
With his fitness he might still be playing at that age
— R Sharma (ਰਾਹੁਲ) (@imdev_Pandit) August 9, 2021
And rishabh pant Jr hiting reverse lap on the new ball to jimmy🤘
— Raj Suryawanshi 🇮🇳 (@iamrajs0) August 9, 2021
इंग्लंडच्या चाहत्यांचा समूह आहे बार्मी आर्मी
इंग्लंड क्रिकेट संघाच्या खास चाहत्यांच्या समूहाला बार्मी आर्मी असे संबोधले. जगभरात इंग्लंडचा सामना जेथे कोठे असेल, त्या ठिकाणी शेकडो इंग्लंड समर्थक हजर असतात. १९९४-१९९५ ऍशेसवेळी या गटाला बार्मी आर्मी असे नाव देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा सुकाळ संपला आहे का? चाहत्यांना सतावतोय प्रश्न
इंग्लंडचा जॉनी बेयरस्टोही झाला “या” भारतीय गोलंदाजाचा फॅन
ज्युनिअर तेंडुलकर करतोय आयपीएल पदार्पणाची जोरदार तयारी; सरावाचे व्हिडिओ केले शेअर